नांदेड/प्रतिनिधी - श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मागील दहा वर्षापासून विविध क्षेत्रातील आयकॉनांना डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करणे हा प्रेरणादायी उपक्रम असून अशा उत्तुंग व्यक्तीमत्वांच्या कार्याची महती ही सर्वांसाठी उत्साह वाढवणारी असल्याने हे कार्य सातत्याने यापुढेही सुरूच रहावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केले.
मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, समीक्षा, पत्रकार प्रेस परिषद, ह्युमन राईटस् फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने आयोजीत डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार सोहळ्यात माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बि.व्ही.जी.चे संस्थापक हणमंतराव गायकवाड, माजी मंत्री आ.डी.पी.सावंत, उस्तरी मराठाचे कोरणेश्वर स्वामी, बायोशुगरचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, पद्मजा सिटीचे संचालक बालाजीराव जाधव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र वाघमारे, इंटीग्रेटेड इंडियाच्या संस्थापीका श्रीमती ओजस्वी राजे व सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे सचिव स.भागींदरसिंघ घडीसाज यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, दिलीप माहोरे, डॉ.मिनाक्षी कागडे, सौ.जयलक्ष्मी गादेवार, सौ.प्रिती जैस्वाल, सौ.जयश्री राठोड, बालाजी पवार, स.हरजिंदरसिंघ संधू, सौ.पद्माताई झंपलवाड, सौ.अरूणा पुरी, शिवहरी गाढे व संपादक रूपेश पाडमुख यांनी शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक पद्मजा सिटीचे संचालक बालाजीराव जाधव यांनी करतांना श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या सहवासात पैठण येथील शेतातील फार एैतिहासिक आठवण सांगीतल्याने उपस्थित भावूक झाले. त्यांची दुरदृष्टी व सार्वजनिक काम करण्याच्या हातोटीबद्दल सांगत दहा वर्षाच्या पुरस्काराच्या कारकिर्दीची वाटचाल सांगीतली.
सदरील सोहळ्यात दिग्दर्शक समीर चौघुले, संगीत क्षेत्रातील नवीन पर्व साजन-विशाल, डॉ.मिलींद भोई, सौंदर्यवती सौ.शिल्पी अवस्थी, सिंक्रोनायझर राजशेखर चावला, आयबीएन लोकमतच्या निलीमा कुलकर्णी, कॅन्सरतज्ञ डॉ.आनंद भगत, पहिली सोलो रायडर स्नेहल वानखेडे, शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे मराठा सेवासंघाचे कामाजी पवार यांच्यासह उमरीचे मारोतराव कवळे गुरूजी, विधीज्ञ ऍड.आर.जी.परळकर, लातुर येथील दयानंद पाटील, प्रा.डॉ.वैजयंता पाटील, संस्थाचालक प्रा.मजरोद्दीन एम.डी.खलिलोद्दीन, शून्यातून विश्व निर्माण करणारे सुनिल राठोड, वन परिक्षेेत्रात शासनाच्या धोरणाचे काटेकोरपणे पालन करत पर्यावरणपूरक उपक्रम राबवणारे के.वाय.शेख, लातुरचे व्ही.एम.पँथरचे संस्थापक विनोद खटके, लातुर जिल्ह्यातील हरंगुळ येथील जलयुक्त शिवार समितीचा सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
सातारा रहिमतपुर ते राष्ट्रपती भवन अशी भरारी घेणार्या व व्यवसायाला सामाजीक बांधीलकीचा स्पर्श देत देशभरात २२ राज्यात आणि ७० शहरात इंटीग्रेटेड सर्व्हीस कंपनीतून ८० हजारापेक्षा जास्त तरूणांना रोजगार देणार्या बीव्हीजीचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांचा सह्दय सत्कार करण्यात आला असून त्यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीपासून आतापर्यंतच्या प्रवास सांगत सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन संतोष देवराये यांनी तर आभार संपादक रूपेश पाडमुख यांनी मानले.
No comments:
Post a Comment