शारदा ज्युनिअर कॉलेज मध्ये पालक-शिक्षक सहविचार सभा

Tuesday, July 17, 2018

लातूर दि. १५ येथील रॉयल एज्युकेशन सोसायटीच्या कॉक्सिट संलग्न शारदा ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक-शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली. याप्रसंगी संस्थाअध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील सरांनी पालकांना मार्गदर्शन केले.

  तसेच महाविद्यालयात असलेल्या अद्यावत कॉम्प्युटर लॅब नविन शैक्षणिक वर्षात होऊ घातलेल्या नीट व जेईई स्पर्धा परीक्षांची तयारी ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी उपयोग करावा असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या निट जेईई ची परीक्षेची विशेष तयारी, शिस्त, पालकांचे सहकार्य आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
पालक प्रतिनीधी म्हणून श्री यशवंत कांबळे, श्री शेख नबी आदिंनी आपल्या मनोगतात कॉलेजच्या नियोजनासंबंधी समाधान व्यक्त केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे सरांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासुन दुर ठेवण्याचे आवाहन पालकांना केले.कार्यक्रमाचे प्रास्तावीक उपप्राचार्य डॉ. एन. व्ही. मोरे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. श्री भूषण भोगावकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृंद वशिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले

No comments:

Post a Comment