लातूर, दि. १६ - श्री जानाई प्रतिष्ठान प्रकाशीत, डॉ.अतुल निरगुडे यांचे वीस निकटवर्तीय महानुभव लिखीत, डॉ अतुल निरगुडे यांच्यावर श्रध्दांजली पर ‘ अतुलपर्व ‘ पुस्तक प्रकाशन कार्यक्रम श्री जानाई प्रतिष्ठान व आयुर्वेद व्यासपीठ यांनी आयोजीत केला होता. ‘ मानसामधील देव म्हणजे अतुल निरगुडे ‘ असे भावनिक उद्गार ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यावेळी काढले.
रविवार दिनांक १५ जुलै २०१८ रोजी सायं ६ वा. जानाई सभागृहात भावनिक वातावरणात ह.भ.प. गहिनीनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते अतुलपर्व पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ.आशोक कुकडे , आयुर्वेद व्यासपीठाचे संस्थापक सदस्य डॉ गीरीश वेलनकर, आयुर्वेद व्यासपीठ शाखा लातूरचे अध्यक्ष डॉ रूद्राप्पा धाराशिवे, श्री जानाई प्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.आरती संदीकर उपस्थित होते.
डॉ अतुल निरगुडे यांनी आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्याच्या आजोबांच्या नावाने श्री रामचंद्र न्यास स्थापन केला होता. त्या न्यासाच्या आयुर्वेद कार्या साठी डॉक्टरांच्या वीस अत्यंत निकटवर्तीयांनी जमा केलेला रू एक लाखाचा निधी
No comments:
Post a Comment