लातूर,दि.१६:-लातूर शहरातील विद्यार्थीनी भक्ती बिडवे हिने जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमातून इयत्ता १० वी मध्ये ९७.४० टक्के गुण संपादन करून घवघवीत यश मिळविले आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भक्ती बिडवेंनी अथक परिश्रमातून साध्य केलेल्या यशाबद्दल पुष्पगुच्छ,सन्मानपत्र व पुस्तक भेट देऊन सत्कार केला व तिच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment