लातूर / प्रतिनिधी
अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम शेवटच्या टप्यात असून लातूर शहर मनपाने पहिल्या टप्यात शहरातील आदर्श आणि सरस्वती कॉलनीत वॉटर मिटर बसविण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी टेंडरही काढले आहे अशी माहिती आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी पत्रकारांना दिली.
अमृत योजनेतील कामाची माहिती देताना आयुक्त म्हणाले २२ ठिकाणी क्रॉस कनेक्शनचे काम जवळपास पुर्ण होत आल्याने शहरातील ७५ टक्के भागात जास्त दाबाने पाणीपुरवठा होऊ शकेल. मेकॅनिकल कामाचे टेंडर काढण्यात आले. ते मंजूरीसाठी स्थायी समितीकडे दिले आहे. अमृतच्या संबंधित कंत्राटदारावर ३१ जुलै पर्यंत रू. १५ लाख दंड लावण्यात आला आहे. पण केवळ दंडात्मक कारवाई करून भागणार नाही. आमचे मागेल त्याला पाणी हेच धोरण आहे.
वॉटर मिटर संदर्भात अधिक माहिती देताना आयुक्त म्हणाले पुर्वीच्या तुलनेत मिटरचे दर रू. २८०० पर्यंत कमी केले आहे. याउपर तेच मिटर बसवावे अशी सक्ती असणार नाही. नागरीकांनी त्यांना परवडेल तेथून खरेदी करून वॉटर मिटर बसवावे. आमचे अभियंते ते प्रमाणित करून देतील. याशिवाय लातूर शहरात अमृत टप्पा-२ लवकरच सुरू होणार आहे. त्यासठी पाठपुरावा केला जात आहे.
शहरात ४६ ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. परंतू अनेक ठिकाणी विरोध होत आहे असे आयुक्तांनी म्हटले. त्यावर जिल्हाधिकार्यांनी विरोध करणार्यांची अगोदर समज काढा अन्यथा कारवाई करा शौचालय होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. सदरील सुलभ शौचालय चालविण्यासठी महिलांना दिले जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले. शहरातून प्लाटीक बंदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत तीन टन प्लास्टीक जप्त करण्यात आले अशी माहिती आयुक्त दिवेगावकर यांनी दिली.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment