पीककर्जाला टाळाटाळ करु नका, अन्यथा बँकांना टाळे लाऊःजिल्हाधिकारी

Saturday, July 7, 2018

लातूर / प्रतिनिधी

जिल्ह्यात आजपर्यंत शेतकर्‍यांना ५६२ कोटीचे पीककर्ज वाटप झाले आहे. हे प्रमाण मराठवाड्यात सर्वाधिक असले तरी अद्याप कमीच आहे. येत्या १५ जुलै पर्यंत बँकांनी पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट पुर्ण करावे अन्यथा त्या बँकेतील अकाउंट नव्हे तर बँकेलाच टाळे लावले जाईल असा इशारा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी जिल्हा परिषद सीईओ डॉ. बीपीन इटकलकर, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित होते.



पिककर्ज वाटपात लातूर जिल्हा बँक अव्वल स्थानी आहे. त्यांनी १०८ टक्के उद्दीष्ट पुर्ण केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी १८ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ३२ टक्के उद्दिष्ट पुर्ण केले अशी माहिती देवून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनते लातूर जिल्ह्यातील एक जाख ४० हजार ५११ शेतकर्‍यांचे ३८७ कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. बँकानी १५ जुलै पर्यंत पीककर्ज वाटपाचे १०० टक्के उद्दिष्ट पुर्ण करावे आता पीकविमा काढण्यासाठी पिकपेरा प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचेही ते म्हणाले.

अनाधिकृत बॅनर धोरण 
मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी अनाधिकृत बॅनर संदर्भात धोरण गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. पोलीस अधिक्षक, आरटीओ सोबत या संदर्भात बैठक असून डिजीटल बॅनरवर परवानगी क्रमांक, नोडल ऑफीसर मार्फत गुन्हे दाखल केले जातील. भाऊ भैय्या विरूद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्तांनी दिला. नुकतेच शहरातील विलासराव देशमुख मार्गावर कमानीच्या खड्यात पडून तरूणाचा मृत्यू झाला. त्यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. करारनम्यातील अटीप्रमाणे कंत्राटदाराने अपदात होवू नये यासाठीची रचना करावयाची आहे.

ते निवेदन आले नाही 
आ. अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत शहरातील गुन्हेगारीचा आलेख मांडत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार असल्याचे म्हटले होते. तसेच चुकीचे शस्त्र परवाने यावरही कटाक्ष टाकला होता. त्या अनुषंगाने जी श्रीकांत यांनी कॉंगे्रसचे निवेदन आले नाही मी यासंबंधी वर्तमानपत्रातून वाचले. अविनाश चव्हाण यांची हतया ही सुसंकृत. शहरातील निंदनीय घटना होय. ते क्लासवॉर नसून पैसेवॉर असल्याचे माझे वैयक्तिक मत असून आम्ही क्लासचालक किंवा प्राध्यापकांना शस्त्रपरवाने दिलेले नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

बँकेविरूद्ध कडक कारवाई 
पीककर्ज पासून शेतकरी वंचित राहता कामा नये यासंबंधी खबरदारी बँकांनी घ्यावी, टाळाटाळ करू नये आम्ही दर १५ दिवसांनी आढावा घेत आहोत. शुल्लक कारणावरून कोणी टाळाटाळ करत असेल तर शेतकर्‍यांनी थेट तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. पीककर्ज न देणार्‍या बँकांवर कडक कारवाई करताना आरबीआयला सांगून बँक बंद करायला लावू असा इशारा देताना जिल्हाधिकारी अलाहाबाद बँकेस कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती दिली.


त्यांना एक हजार रूपये 
लातूर जिल्ह्यात २२ हजार ४९६ एवढ्या नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांनी तूर खरेदी केली गेली नाही शासनाच्या आदेशाप्रमाणे त्या शेतकर्‍यांना एक हजार रूपये अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment