वेश्याव्यवसाय व सट्टेबाजार कायदेशीर करा : माजी न्या हेगडे

Saturday, July 7, 2018

बंगळूर : भारतात वेश्याव्यवसाय हे कायदेशीर करावे असे मत माजी न्यायमूर्ती संतोष हेगडे यांनी केले या सोबत त्यांनी विधी आयोगाने जो सल्ला दिला आहे कि  सट्टेबाजी कायदेशीर करावी या मागणीचे पण त्यांनी समर्थन केले . सट्टेबाजीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारप्रणालीत समाविष्ट करता येईल तसेच सट्टेबाजीतील अनेक गोष्टी सरकारला नियंत्रणात आणता येतील असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे 

आज वेश्या व्यवसाय हि सामान्य बाब झाली आहे अशा वेळी या व्यवसायाला कायदेशीर मनत्य देऊन व्यवसायातील लोकांना परवाना दिला पाहिजे या मूळे सरकारला नियंत्रण करणे सोपे जाईल भारत देशात प्रत्येक शहरात हा व्यवसाय चालतो हे आपण पहिले आहे सट्टेबाजी आणि वेश्याव्यवसाय कायदेशीर केल्यास ७०-७५ टक्के बेकायदेशीर व्यवहार बंद होतील असा विश्वास माजी न्यायमुर्ती संतोष हेगडे यांनी व्यक्त केला आहे 
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment