हिंगोली / प्रतिनिधी
शहरातील नाईक नगर भागात विद्युत खांबावर चढलेल्या माधव विठ्ठल चांदणे नामक व्यक्तीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ६.३०च्या सुमारास घडली. मयत व्यक्तीचा मृतदेह उशिरा लटकलेल्या अवस्थेतून खाली काढून तो हिंगोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालया शवविच्छदनासाठी नेण्यात आला आहे.
नाईक नगर भागात स्वामी समर्थ मंदिरासमोर विद्युत डिपीला लागून असलेल्या एका खांबावर चांदणे हा व्यक्ती वर चढला होता. वर गेल्यानंतर तारेला हात लागल्याने शॉक लागून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सदर व्यक्तीने खांबावर चढण्याअगोदर डिपीवर त्या खांबाला असलेला विद्युत पुरवठा बंद केला होता अशी माहिती आहे. पण तो ज्या खांबावर चढला होता त्या खांबावर दुसऱ्या एका ठिकाणावरून वीज जोडणीतील विद्युत प्रवाह सुरू होता अशी माहिती पुढे येत आहे.
मृत व्यक्ती हा हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील असून त्याचे वय ४५ वर्षे आसपास आहे. सायंकाळी उशिरा त्या व्यक्तीचा मृतदेह खाली काढून हिंगोली जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान सदर व्यक्तीने त्या विद्युत खांबावर चढण्याअगोदर संबंधीत वीज वितरण कंपनीच्या कुण्याच अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नव्हती शिवाय सदर व्यक्ती हा वीज वितरण कंपनीमध्ये कर्मचारी अथवा विद्युत मित्र म्हणून देखील काम करत नव्हता अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या बाबत पोलीस तपासा नंतरच तो नेमक्या कोणत्या कारण मुळे वर चढला होता हे समजणार आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment