महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढविणार : नारायण राणे

Friday, July 6, 2018

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील २०१९ मध्ये विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली.

खा . नारायण राणे म्हणाले, आगामी लोकसभा व विधानसभेच्या या जिल्ह्यातील सर्व जागा स्वाभिमान पक्षाच्यावतीने लढवून या चारही जागा जिंकणार आहे. तसेच राज्यात पक्षाच्यावतीने निवडणूक लढविल्या जाणाऱ्या जागा निवडणूका जवळ आल्यावर जाहीर करणार आहे.

No comments:

Post a Comment