टायगर झिंदा है नंतर सलमान-कतरीनाची जोडी धूम ४ मध्येही दिसणार अशी चर्चा आहे. धूम ३मध्ये आमीर खानसोबत कतरिनाची जोडी होती, त्यामुळे कतरिनासाठी धूमची सीरिज काही नवी नाही. सलमान खान धूम ४ करणार हे ठरल्यावर सलमान खानसोबत कतरिनाच्या नावाची वर्णी लागणं हे काही फार धक्कादायक नाही. कारण कतरिना ही सलमानची खास मैत्रीण आहे आणि सलमान-कतरिनाची ऑॅन स्कि‘न जोडी प्रेक्षकांना पहायला आवडते.
त्यामुळे यशराजनेही सलमान-कतरिना जोडीलाच प्राधान्य द्यायचं ठरवलेलं दिसतंय. सलमान-कॅटच्या चाहत्यांसाठी ही एक धमाल ट्रीट असू शकते. पण रेस-३ वर झालेली टीका पाहता यावेळी तरी सलमानने सिनेमाची कथा पाहूनच सिनेमा स्वीकारावा, असा सल्ला सलमानला सोशल मीडियावर अनेकांनी दिलाय.
सलमान आणि कतरिना यांचा एकत्र असा हा सहावा सिनेमा. आणि त्यांची केमिस्ट्री नेहमीच रंगते.

No comments:
Post a Comment