बॉलीवूडचा ‘चॉकलेट हिरो’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहीद कपूर ह्यांने २००३ साली ‘इश्क विश्क’ ह्या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर आतापर्यंत अश्या ह्या पंधरा वर्षांच्या काळामध्ये म्हणावे तसे यश शाहीदच्या वाट्याला आलेले नाही. मध्यंतरी आलेले ‘जब वी मेट’, ‘विवाह’, ‘हैदर’ यांसार‘या चित्रपटांमुळे शाहीदच्या यशाचा आलेख काहीसा चढता भासला असला, तरी त्यानंतरही शाहीदच्या वाट्याला, त्यांच्या बरोबरच्या कलाकारांच्या मानाने कमीच यश आले. आपल्या कार्कीरीदिमध्ये बॉलीवूड कलाकार अनेक चित्रपट नाकारतात. त्यामागे कधी वेळेची उपलब्धता नसणे, किंवा चित्रपटाचे कथानक न आवडणे अशी अनेक कारणे असू शकतात. तसेच एखाद्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांनी आपल्याला स्वीकारल्यानंतर जरा हटके भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल किंवा नाही, अशी शंका आल्यामुळेही बॉलीवूड कलाकारांनी चित्रपट नाकारले आहेत.
अभिनेता शाहीद कपूर ह्याने ही आपल्या कारकीर्दीमध्ये अनेक चित्रपट, काही ना काही कारणाने नाकारले. पण त्यानंतर हे चित्रपट बॉक्स ऑॅफिसवर इतके यशस्वी झाले, की ह्या चित्रपटांमध्ये शाहीदने भूमिका केल्या असत्या, तर त्या नक्कीच गाजल्या असत्या. सुपरहिट चित्रपट ‘रंग दे बसंती’ ह्या चित्रपटामध्ये शाहीदला भूमिका देऊ करण्यात आली होती. ही भूमिका शाहीदने नाकारल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ ह्याने ही भूमिका केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑॅफिसवर प्रचंड गाजला. ह्या चित्रपटातील भूमिका नाकारल्याचा पश्चात्ताप आपल्याला आजही होत असल्याचे शाहीदने नंतर एका मुलाखतीमध्ये म्हटले होते.
‘रांझना’ ह्या चित्रपटातील मु‘य भूमिकाही शाहीदला देऊ करण्यात आली होती. पण त्याचे ‘मौसम’ आणि ‘तेरी मेरी कहानी’ हे दोन्ही रोमँटिक चित्रपट बॉक्स ऑॅफिसवर दणकून आपटल्याने आणखी एक रोमँटीक चित्रपट करण्याची शाहीदची तयारी नसल्याने त्याने हा चित्रपट नाकारला. त्याचप्रमाणे ‘राजनीती’ ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूरने केलेली भूमिका सुरुवातीला शाहीदला देऊ केली गेली होती. पण ही भूमिका दुय्यम आहे असे वाटून शाहीदने ही भूमिका नाकारली. त्यानंतर हीच भूमिका रणबीर कपूरने केली आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीलाही उतरली. हा चित्रपटही बॉक्स ऑॅफिसवर यशस्वी ठरला. ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा चित्रपट शाहीदने स्वीकारला खरा, पण ह्या चित्रपटाचे चित्रीकरण लांबणीवर पडत चालले होते. त्यामुळे शाहीदने हा चित्रपट सोडून देऊन दुसर्या चित्रपटांकडे आपले लक्ष वळविले. त्यानंतर ही भूमिका तत्कालीन नवोदित अभिनेता सुशांत सिंह राजपूत ह्याने केली. हा चित्रपटही प्रक्षकांनी पसंत केला.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment