उज्वल निकम यांची नियुक्ती करा
लातूर दि प्रतिनिधी : www.mnetaonline.com
स्टेप बाय स्टेप क्लासेस चे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्ये प्रकरणात अटक करण्यात आलेला चंदन कुमार शर्मा हा केवळ मोहरा असून खरा मास्टर माईंड दुसराच कोणी तरी आहे लातूर पोलिसांनी सखोल तपास करून त्याचा शोध लावावा अशी मागणी मयत अविनाश चव्हाण चे वडील बाबुराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले आहे
संबंध महाराष्ट्रात गाजलेल्या अविनाश चव्हाण हत्या प्रकरणात पोलिसांनी तत्परतेने तपास लावून ५ आरोपीना अटक केली त्या बद्दल त्यांचे अभिनंदन करून बाबुराव चव्हाण म्हणाले विषय इथेच संपत नाही अविनाश चव्हाण हा गोर गरीब विध्यार्थ्यांसाठी काम करत होता इतर शिकवणी क्लासेस मध्ये ३ विषयाचे मिळून रुपये ७५ हजार फीस घेतात मात्र अविनाश चव्हाण अत्यंत कमी म्हणजे २५ हजार फीस घेत होता त्या मुले या प्रकरणात अटक केलेल्या ५ आरोपी शिवाय व्यावसायिक स्पर्धेतून दुखावलेले आणखीन व्यक्ती आसू शकतात चंदन कुमार हा परराज्यातील आहे तो एवढे मोठे षडयंत्र रचू शकत नाही तो केवळ मोहरा असून खरा मास्टर माईंड वेगळाच आहे पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली
अविनाश चव्हाण खून खटला प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी खटला जलदगती न्यायालयात चालून गुन्हेगारांना फाशी ची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मयत अविनाश चव्हाण चे वडील बाबुराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले आहे
या वेळी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शाम जाधव नर्सिग बंडगर शिवाजी चव्हाण , देवा पवार ,राजेंद्र भांडेकर रोहिदास इरकले , श्याम इटकर , आदी उपस्तित होते
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment