आस्था कौशल्य विकास केंद्राचा उद्या शुभारंभ

Saturday, June 30, 2018





लातूर, दि. २९ : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून आस्था केशवराज शैक्षणिक संकुल एमआयडीसी येथील आयटी पार्क येथे कामगार कौशल्य विकासमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते आस्था कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ रविवार दि. १ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम क्षेत्राचे पूर्व संघचालक तथा विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. अशोकराव कुकडे हे राहणार आहेत. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्ळणून खा.डॉ. सुनील गायकवाड, माजीमंत्री आ. अमित देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, रोजगार विभागाचे सहाय्यक संचालक बालाजी मरे, एमआयडीसी लातूर विभागीय अधिकारी महेश मेघमाळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मराठवाड्यातील ग्रामीण व निम्न शहरी भागातील तथा कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्माण, युवा सन्मान आणि देशसेवा अशा विविध उद्दिष्ठांनी युवक-युवतींना उद्योगाभिमूख कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार आणि जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. 

आस्था कौशल्य विकास केंद्राच्या शुभारंभ कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रिय कार्यवाह नितीन शेटे, स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह जितेश चापसी, आस्था शैक्षणिक संकुलाचे संचालक किरण भावठाणकर, आस्था कौशल्य विकास केंद्राचे संचालक विवेक शिर्शीकर, केंद्रप्रमुख अण्णासाहेब साठे, जनसंपर्क अधिकारी राहूल गायकवाड, प्राचार्य प्रशांत दळवी आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment