स्थायी समितीच्या बैठकीत जि.प.सदस्या पूनमताई पवार संतापल्या
नांदेडः- नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमा लावण्याची मागणी जि.प. सदस्या सौ. पूनमताई पवार यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत लावून धरली. परंतु या समितीत सदस्य असलेल्या कॉंग्रेस कपूंनी या मागणीला विरोध तर केलाच परंतु दिशाभूल करणारी माहिती समितीसमोर ठेेवण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसच्या या विकृत राजकारणाचा सौ. पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमा लावाव्यात असे राज्य शासनाचे निर्देश आहे. राष्ट्र पुरुषांचे विचार हे प्रेरणादायी असून नवीन पिढीला त्यांचे विचार स्फुर्ती देणारे असतात. राहावी हाच उद्देश या मागचा आहे. तेंव्हा नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहामध्ये राष्ट्र पुरुषांच्या प्र्रतिमा नाहीत ही बाब जि.प.सदस्या पूनमताई पवार यांना जि.प.च्या पहिल्याच सर्वसाधारण सभेच्यावेळी निर्देशनास आली होती.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना राज्यातील ज्येष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने झालेली आहे. त्यामुळे नांदेडच्या जि.प.सभागृहास यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आलेले आहे, यांचा सर्वांना अभिमान वाटतोच. त्याचबरोबर या सभागृहात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज तसेच भारताचे प्रथम नागरीक राष्ट्रपती रामनाथ कोेविंद, केंद्राचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री देेवेंंद्र फडणवीस यांच्याही प्रतिमा या सभाागृहात लावण्यात याव्यात, अशी मागणी जि.प.च्या आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सौ. पूनमताई यांनी पुन्हा लावून धरली. परंतु तेंव्हा समितीच्या पदाधिकार्यांनी तर भाजपा सरकारनेच राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमा लावू नये या संबधात निर्णय घेतल्याचे खोटी माहिती दिली. त्यावर सौ. पवार यांनी शासन निर्णयाची प्रत सभागृहासमोर ठेवण्याची मागणी केली. कॉंग्रेस पक्ष नेहमी आपल्या भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेत असते. मग सभागृहात राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमा लावण्यास कॉंगे्रसचा विरोध कशाकरिता असा सवालही त्यांनी केला. तरी पण समितीच्या पदाधिकार्यांंनी तो आदेश देण्यास टाळाटाळ सूरु केली. तेंव्हा सौ. पवार यांनी आपली मागणी जोरदारपणे लावून धरली. तेंव्हा प्रशासनाने राज्य शासनाचा राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमा लावण्याबाबतचा शासन निर्णयाची प्रत सादर केली. समितीच्या पदाधिकार्यांने सांगितलेली माहिती अंत्यत खोटी व दिशाभूल करणारी आहे अशी टीका सौ. पवार यांनी केली. शासन आदेशात कुठेही राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमा लावू नये असे म्हंटलेले नाही. परंतु या महापुरुषांच्या प्रतिमेचा आकार आणि ते कोठून घ्यावयाची या संबधात काही निकष नमुद करण्यात आलेले आहे, हे त्यांनी निर्देशनास आणून दिलेे. यावरही काही सदस्याने सभागृहात प्रतिमा लावता येत नाही असे म्हणून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. जि.प.अध्यक्ष व इतर पदाधिकार्यांच्या दालनात मराठवाड्याचे भूमीपूूत्र स्व. शंकरराव चव्हाण यांची प्रतिमा लावण्यात आली आहे. ही बाब नांदेेडकरांसाठी भूषणावह आहे. जि.प.चे सभागृह हे लोकप्रतिनिधीच्या हक्काचे आणि लोकशाहीचे प्रतिक आहे. त्या सभागृहात राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमा लावण्यास कॉंग्रेस सदस्यांचा विरोध हा विकृत राजकारणाचे उदाहरण आहे. या स्थायी समितीच्या बैठकीत महिला सदस्या प्रश्न व समस्या मांंडत असताना केवळ विरोध म्हणून चुकीची माहिती देणे, मोेठ मोठ्याने बोलणे अथवा महिला सदस्यांना बोलू न देणे अशा प्रकारची वागणूक महिला सदस्यांना दिली जात असल्यााबद्दल सौ. पूनमताई यांनी नाराजी व्यक्त केेली.
बेळगे यांचा चापलूसीपणा
जि.प. ही कांही कॉंग्रेसची मालमत्ता नाही, राज्यघटनेेनूसार लोकप्रतिनिधी या संस्थेवर निवडून येतात. ही मालमत्ता जनतेची आहे त्याचा आदर आणि सन्मान करणे हे कॉंग्रेसच्या रक्तात नाही. त्यामुळे जि.प. सदस्य संजय बेळगे यांच्यासारखे सदस्य कॉंग्रेस नेत्यांची मर्जी संंभाळण्यासाठी व चापलूसी करण्यासाठी सतत विरोधी भूमिका घेत असतात. त्यांच्या या सततच्या विरोधी भूमिकेमूळे अनेक लोकहिताची कामे होत नाहीत याची त्यांना लाजही वाटत नाही. इतकेच नव्हे जि.प.च्या सभागृहात महिला सदस्यांशी कसे वागावे यांचे सौजन्य त्यांना नाही अशा शब्दात भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश पवार यांनी बेळगे यांच्या कार्यपध्दतीवर टीका केली.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment