अहमदपूर : शिक्षणपंढरी म्हणुन ओळखला जाणार्या अहमदपूर शहरात येत्या काळात लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे आणि जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे पुर्णाकृती पुतळे उभारण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ता तथा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे पुतळा समितीचे अध्यक्ष गणेशदादा हाके पाटील यांनी दि.२९ रोजी त्यांच्या निवासस्थानी आयोजीत पञकार परिषदेमध्ये सांगितले.
पुढे बोलताना श्री.गणेशदादा हाके पाटील म्हणाले की लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे अहमदपूर विधानसभा मतदार संघावर विशेष लक्ष होते त्यामुळे आणि युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांच्या समतया विचार सर्वसामान्य नागरिंकापर्यंत जावा म्हणुन अहमदपूर नगरपरिषदे च्या जागेत, शिवाजी चौकाच्या बाजुस लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा पुर्णाकृती पुतळा तर ,एस.टी.बस स्टँड च्या आगाराच्या ञिकोणी मोकळ्या जागेत महात्मा बसवेश्वर अश्वारुढ पुतळा उभारणार आहे.
महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या जागेची मागणी मुख्यमंञी ना.देवेंद्रजी फडणविस,परिवहन मंञी दिवाकरजी रावते,परिवहन राज्यमंञी विजयजी देशमुख,यांच्याकडे मुंबईला शिष्टमंडळाच्या द्वारे मागणी करण्यात येणार आहे.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे समितीच्या कार्याध्यक्ष पदी जि.प.सदस्य अशोककाका केंये,उपाध्यक्ष ऍड.भारतभाऊ चामे,जि.प.बांधकाम सभापती प्रकाशराव देशमुख,ञ्यंबक आबा गुट्टे,राम तत्तापुरे,संतोष शेप,विनोद गायकवाड तर महात्मा बसवेश्वर पुतळा समितीच्या कार्याध्यक्ष पदी सांब महाजन,उपाध्यक्ष डी.बी.लोहारे,नगरसेवक लक्ष्मिकांत कासनाळे,कमलाकर होनराव सर्व मान्यवरांची सदस्य म्हणुन कार्यकारणी मंडळावर निवड करण्यात आली आहे. दोन्ही पुतळ्याची कृती समिती स्थापन करण्यात आली असुन पुतळा उभा करण्यासाठी जागेची मागणी नगराध्यक्षा सौ.आश्वीनी कासनाळे* यांना समितिचे अध्यक्ष गणेशदादा हाके पाटील यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
यावेळी पुतळा कृती समितीचे सचिव हेमंतभाऊ गुट्ठे,नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे,नाथराव केंद्रे,एजाज बक्षी हनमंत देवकत्ते,यशवंत केंद्रे,रघुनाथ गोरे,प्रदिप वट्टमवार,महेश ढाकणे सह पुतळा समितीचे पदाधिकारी यांच्यासह ईतर नागरिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment