राजकीय अफवाना वस्तुस्थितीने चोख उत्तर देऊ : मुख्यमंत्री

Tuesday, July 3, 2018


नागपूर दि विशेष प्रतिनिधी 


सोशल मीडियावर अफवांचे पीक पसरवले जाते तशाच प्रकारे विरोधी पक्षांकडून सध्या राजकीय अफवा पसरविल्या जात आहेत विरोधकांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर सभागृहात उत्तर दिले जाईल असे बोलून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या राजकीय अफवाना वस्तुस्थिती मांडून चोख उत्तर दिले जाईल असे म्हटले आहे 

नागपूर येथे बुधवार पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सरकारची भूमिका मांडली या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर विश्लेषण केले . पावसाळी अधिवेशनात २७ विधेयकांवर चर्चा होणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच फक्त ५ ते ६ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले अशी टीका विरोधक करत आहेत त्यात तथ्य नसून आत्तापर्यंत २५ टक्के शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही असाही सूर विरोधक आळवत असतात मात्र त्यात काहीही तथ्य नाही. कारण किती शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यात आले त्याची माहिती मागील अधिवेशनाच्या वेळीच पेन ड्राईव्हमध्ये देण्यात आली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मागील सरकारच्या काळात ५ वर्षात १७ ते १८ हजार कोटींचे कर्ज वाटप झाले. मात्र आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त कर्ज वाटप केले असाही दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 

आमच्या कारभारावर टीका केली जाते आहे मात्र त्यात काहीही तथ्य नाही. तसेच नवी मुंबई जमीन घोटाळ्याचे आरोपही त्यांनी खोडून काढले. सोमवारीच पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने नवी मुंबईत जमीन घोटाळा झाल्याचा आरोप केला. सरकारने प्रकल्प ग्रस्तांना जमिनी विकण्याचे अधिकार २००४-०५ मध्येच देण्यात आले. ते काढून घ्यायचे असतील तर त्यासाठी त्यांना विश्वासात घ्यावे लागेल. माझ्यावर जे काही आरोप लावण्यात आले ते बिनबुडाचे होते असेही त्यांनी स्पष्ट केले.


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment