पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्राचे आरोग्य विभागास ३१ कोटी ५० लाख मंजूर

Thursday, July 5, 2018

लातूर :

पालकमंत्र्याचा पाठपुराव्यामुळे केंद्राचे आरोग्य विभागास ३१ कोटी ५० लाख मंजूर या निधी साठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे यात ३ नवीन आरोग्य केंद्राचा समावेश आहे

लातूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रात पालकमंत्री संभाजीराव पाटील यांनी निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. यानुसार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्याला ३१ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

यात जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

१ किनगाव, उजनी व मदनसुरी येथे नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ३ कोटी ७७ लाख रु.


२ कव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र, अधिकारी व कर्मचारी निवासस्थानासाठी ५ कोटी ६० लाख रु.

३ नळेगाव, वलांडी व पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थानासाठी प्रत्येकी १ कोटी ८० लाख रु.

४ हंडरगुळी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ३ कोटी ४१ लाख रु.

५ जवळगा, पोमादेवी प्राथमिक आरोग्य केंद्र व अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानासाठी ४ कोटी रु.

६ जिल्हा औषध भांडारासाठी ८२ लाख रु.

७ विभागीय औषध भांडारासाठी ९७ लाख रु

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment