लातूर/प्रतिनिधी -भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयक पदी प्रविण कस्तुरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर नियुक्तीचे पत्र पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते व शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलेले आहे.
भाजपा व परिवारात एकनिष्ठेने कार्यरत असलेले प्रविण कस्तुरे हे अवघ्या जिल्हाभरात भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. प्रविण कस्तुरे यांनी भाजपासह परिवारात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयक पदी प्रविण कस्तुरे यांची नियुक्ती करण्यात आलेली असून आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव या पदासाठी योग्य असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचे पत्र पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते प्रविण कस्तुरे यांना देण्यात आलेले आहे. प्रविण कस्तुरे यांनी समन्वयक म्हणून भाजपा शहर, परिवार व महानगरपालिका यांच्यात समन्वय साधण्याचे काम पार पाडणे अपेक्षीत आहे.
प्रविण कस्तुरे यांना सदर नियुक्ती पत्र देतांना भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे, मंडल प्रमुख रवि सुडे, राजकुमार अकनगिरे, पप्पू धोत्रे, ऍड. ज्ञानेश्वर चेवले यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री निलंगेकर यांनी प्रविण कस्तुरे यांना सदर जबाबदारी यशस्वी पार पाडावी अश्या शुभेच्छा देऊन या माध्यमातून पक्षाची विचारधारा अधिक मजबुत करावी अश्या सुचना केल्या. या निवडीबद्दल मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रविण कस्तुरे यांचे अभिनंदन केले आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment