जाचक मालमत्ता करासंदर्भात हायकोर्टाची मनपाला नोटीस

Tuesday, July 3, 2018

प्रकाश पाठक यांच्या जनहित याचिकेवर हायकोर्टाने  मनपाला नोटीस पाठविली

औरंगाबाद / प्रतिनिधी
लातूरातील अन्यायाविरूद्ध लढणारे अभ्यासू व नॉनकरप्ट नगरसेवक प्रकाश पाठक यांनी लातूर मनपाच्या मालमत्ता जाचक कर आकारणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या संदर्भात न्यायमुर्ती बोर्डे व न्यायमुर्ती ढवळे यांनी मनपाला दोन आठवड्याच्या आत खुलासा करावा अशा प्रकारचे नोटीस पाठविलेली आहे.


याबाबत थोडक्यात माहिती अशी की, न खाऊंगा न खाने दुंगा या भुमिकेतून सातत्याने लढा लढणारे नगरसेवक प्रकाश पाठक यांनी लातूर मनपाने जे करासंदर्भात निर्णय घेतलेले नाहीत. ते निर्णय आयुक्त घेऊ शकत नाहीत. ते निर्णय मनपच्या सर्वसाधारण सभेत झाले पाहिजेत. यासंदर्भात सातत्याने प्रकाश पाठक पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या बाजुने औरंगाबाद खंडपीठात ऍड. शरद नातू यांनी म्हणणे मांडले. यावर न्यायालयाने दोन आठवड्याच्या आत लातूर मनपने आपलं म्हणणं सांगावं अशा प्रकारची नोटीस मनपला पाठविण्यात आलेली आहे.

महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी २०१७-१८ या वर्षाची कर वाढ नोव्हेंबर महिन्यात जाहीर केली . आयुक्तांनी ही करवाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच 1 एप्रिल पासून लागू केली वास्तवात कलम 127 प्रमाणे कर लावण्याचा अधिकार फक्त महापालिका आहे सभागृहाला निर्णय घेऊन कर वाढ करावी लागते . पालिकेच्या आयुक्तांना वाढ करण्याचा कसलाही अधिकार नाही . तसेच करवाढ करावयाची असेल तर त्यासंबंधीचा निर्णय 20 फेब्रुवारी पूर्वी घ्यावा लागतो आणि नवी कर वाढ 1 एप्रिल पासून लागू करावी लागते .

लातूर मनप संदर्भात सातत्याने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मनपचे हित डोळ्यासमोर ठेवून व जनतेचे नुकसान होणार नाही व कायद्याची पायमल्ली होणार नाही या भुमिकेतून टॅक्स (कर) कायद्याच्या संदर्भात प्रकाश पाठक यांनी मनपला पत्र दिले. पण न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या जनहित याचिकेचा संदर्भ लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन आठवड्याच्या आत आपलं.मालमत्ता करासंदर्भातील म्हणणे कळवावे अशी नोटीस लातूर मनपला दिलेली आहे.

लातूर मनपा कर आकारणी हा लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा व मनपच्या हिताचा विषय आहे. यात चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जावू नये, कायदा व नियमाप्रमाणे कर आकारणी व्हावी, लोकांचं नुकसान होेऊ नये कायद्याचे पालन केले जावे हीच प्रकाश पाठक यांची भुमिका आहे.

कुठल्याही विषयात तोडपाणी न करता लातूर करांना न्याय मिळवून देणे हा प्रकाश पाठक यांचा शुद्ध आणि स्पष्ट उद्देश आहे. त्या अनुषंगाने या विषयाकडे संपुर्ण लातूरकरांचेच नव्हे तर मराठवाड्याचे लक्ष लागून आहे.

 
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment