६० टक्के भारतीयांना आहे"हा"आजार

Tuesday, July 3, 2018

लातूर दि प्रतिनिधी 
अलीकडेच आध्यत्मिक गुरु भय्यू महाराज , पोलीस अधिकारी हिमांशू रॉय अश्या नामांकित व्यक्तींनी आत्महत्या करून जीवन यात्रा संपविली नैराश्यातून ( डिप्रेशन ) त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले . भारतीय लोकसंख्ये पैकी ६० टक्के लोकांना कोणत्या न कोणत्या तणावाला सामोरे जावे लागते त्यातून आलेल्या नैराश्याला सामोरे जाण्याची मानसिकता कशी आहे , किंवा योग्य वेळी उपचार घेतल्यास आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याची गरज भासणार नाही . शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या केवळ कर्जबाजारी पणातून नव्हे तर शेती पद्धत , समाज रचनेत झालेले बदल , व्यसनाधीनता अशी अनेक कारणे आहेत . आज च्या काळात केवळ शेतकरीच नव्हे तर विध्यार्थी ,अभियंता , व्यापारी , उद्योजक सह प्रत्येक क्षेत्रात डिप्रेशन जाणवते तेव्हा समुपदेशन उपचार गरजेचे असतात असे मत मनोविकार व मानसोपचार तज्ञ डॉ मिलिंद पोतदार यांनी व्यक्त केले 

सावली मानसोपचार रुग्णालयाच्या माध्यमातून डॉ पोतदार हे मागील १२ वर्षांपासून लातुरात रुग्णाची सेवा करत आहेत त्याच प्रमाणे अंतरंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मागच्या ९ वर्षांपासून व्यसनमुक्ती च्या क्षेत्रात कार्यरत आहेत ते दोन्ही सेंटर्स आपल्या स्वतःच्या नूतन विस्तारित वास्तूत अद्यावत सुविधांसह स्थलांतरित होत आहे या सेंटर चे उदघाटन मानसोपचार तज्ञ डॉ आनंद नाडकर्णी ठाणे यांच्या हस्ते होणार आहे त्या संबंधी माहिती देताना मिलिंद पोतदार यांनी पत्रकार परिषदेत डिप्रेशन या आजारा संबधी माहिती दिली . 

आत्महत्येची मानसिकता तयार होणे हे हिमनगाचे टोक आहे आपण मानसिक दृष्ट्या कितीही सदृढ असलो तरी ताणतणाव नैराश्य ला समोरे जाण्याची मानसिक क्षमता प्रत्येकाची वेगळी असते डिप्रेशन झेलणाऱ्या रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून योग्य वेळी समुपदेशन व उपचार गरजेचे असतात ते मिळाले तर डिप्रेशन मधून बाहेर पढण्यास मदत होते असे हि डॉ मिलिंद पोतदार म्हणाले 

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment