स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नांदेड शहर १२७ व्या स्थानी

Tuesday, July 3, 2018

नंबर गेममध्ये येण्याच्या स्वप्नांचा झाला चुराडा

विश्‍वास गुंडावार
नांदेड - बहुचर्चित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये नांदेड शहराला १२७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गतवर्षीच्या सर्वेक्षणात १९३ व्या क्रमांकावर घसरण झाल्याने यंदा पहिल्या ५० मध्ये येण्याचा संकल्प तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी सोडला होता. मात्र तो संकल्प पुर्णत्वास जावू शकला नाही. देगलूर सारखे छोटे शहर एक लाखावरील लोकसंख्येच्या स्पर्धेत पहिल्या ५० मध्य आले े असतांना नांदेडला मात्र १२७ वे स्थान मिळाले. आपण पहिल्या १०० मध्ये येवूतच परंतु पहिल्या ५० शहरांमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत आहोत असे त्यांनी सांगितले होते. परंतु आलेल्या निकालाने गणेश देशमुख यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे.

स्वच्छतेचा मुलमंत्र घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या घराप्रमाणेच आपला देशही स्वच्छ असावा ही संकल्पना मांडून स्वच्छ भारत मिशन ही मोहीम छेडली आहे. यातच देशातील शहरांना स्वच्छतेसाठी या मोहिमेत प्रोत्साहीत करून स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा सुरू केली आहे.

५ लाखावरील लोकसंख्या असलेल्या शहराच्या स्पर्धेत नांदेड शहराचा समावेश होता.येथे देशातील एकूण ५४२ शहरांमध्ये स्पर्धा होती. मागील महिन्यात देश पातळीवरील पहिल्या ५० शहरांची यादी घोषित करण्यात आली. या यादीमध्ये नांदेड शहराचा नंबर नसल्याने नांदेड नंबर गेम मधून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आपले शहर सर्वेक्षणात कुठे आहे याची उत्सुकता प्रशासनासह सर्वसामान्यांनाही लागली होती. ही उत्सुकता निकालाने शमली. ५४२ शहरांच्या स्पर्धेत नादेडचा क्रमांक १२७ वा आला आहे. मागील वर्षी १९३ वा क्रमांक असलेल्या नांदेड शहरात स्वच्छतेचा टक्का वाढल्याचे दिसून आले.

तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख व त्यांच्या टिमने नंबर गेममध्ये येण्यासाठी मोठी मेहनत घेतली. सर्वेक्षणाच्या १ महिना अगोदर पासूनच त्यांनी शहरात स्वच्छता मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेमध्ये नागरिकांना सामावून घेतांना सर्वेक्षणात विचारल्या जाणार्या प्रश्‍नांची यादीच त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केली. ४ हजार गुणांपैकी १४०० गुण नागरिकांच्या प्रतिक्रिया व सेवा स्तरावरील प्रगतीसाठी तर प्रत्यक्ष निरीक्षणासाठी १२०० गुण होते.यापैकी नांदेडला किती गुण मिळाले या संदर्भात सविस्तर माहिती आली नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रमुख गुलाम सादीक यांनी सांगितले.

घणकचरा प्रकल्पाने माघारले
स्वच्छ शहर सर्वेक्षणअंतर्गत नागरिकांच्या प्रतिक्रियेसाठी गुणांकन होते नांदेडकर नागरिकांनी आपल्या शहरावरचे प्रेम अधोरेखीत करून या सर्वेक्षणामध्ये उत्तम फिडबॅग दिला होता. शहरातील कचर्याचे व्यवस्थापन या अंतर्गत गुणांच्या प्रकारात शहराला पिछाडीवर जावे लागले. कचर्याचे संकलन करण्यासाठी मोठी यंत्रणा असली तरी, कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी मात्र घणकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुर्ण होऊ शकला नाही. मागील अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्‍न सर्वेक्षणादरम्यान मार्गी लागला असता तर नांदेड शहर पहिल्या शंभरामध्ये स्थान मिळवु शकले असते, अशी चर्चा आहे. याशिवाय सर्व कामांचे प्रेझेंटेशन यामध्येही नांदेड महापालिका मागे पडली.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment