उमरगा / प्रतिनिधी : आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वातून ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवार दि. ८ जुलै रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार व ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे.
अखंड ज्ञानज्योती सामाजिक व शैक्षणिक उपक्रम असलेल्या या गौरव सत्कार सोहळ्याचे मानकरी पुढीलप्रमाणे युपीएससी परिक्षेत उज्वल यश संपादन करणारे जिल्हाधिकारी गिरीष बदोले, एमपीएससीतून तहसीलदार शरद कांबळे, मुख्याधिकारी सचिन भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, २०१८ च्या ज्ञानज्योती पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे डॉ. दिपक पोङ्गळे (समाजसेवा), डॉ. रमाकांत जोशी (ग्रामीण भागातील रूग्णांची सेवा) प्रविण अणदुरकर, ग्रंथमित्र मोहियोद्दीन सुलतान (सामाजिक व शैक्षणिक कार्य), आणि श्रीमती सरिता उपासे (राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार), याशिवाय उमरगा, लोहारा तालुक्यातील शालांत परिक्षेत १०० टक्के निकाल देणार्या सर्व शाळा, आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोरेगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ल.तां. बेळंब तसेच पाच विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन मेळावा आयोजित केला जातो.
सन २०१८ च्या १० परिक्षेमध्ये उमरगा-लोहारा तालुक्यातील गुनाणुक्रमे प्रथम व द्वितीय येणार्या व बारावी परिक्षेमध्ये प्रत्येक शाखेतील प्रथम येणार्या गुणवंत विद्याथ्यर्त्तंचा सतकार व उमरगा-लोहारा तालुक्यातील प्रथम गुणवत्तेमध्ये येणार्या शाळेस व विविध स्पर्धा परिक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मातोश्री निलाबाई चिंचोळे मंगल कार्यालय, उमरगा येथे सकाळी ११ वा. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड राहतील, जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव व्यंकटराव गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख अनिल खोचरे, कृऊबास सभापती जितेंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, किरण गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment