लातूर / प्रतिनिधी
लातूर येथील शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे छत्रपती शाहू कॉलेज शाखा क्रमांक २ हे शहरातील बसवेश्वर चौक परिसरात उभारण्यात आले आहे. या महाविद्यालयाची संपूर्ण इमारत बेकायदेशीर आहे. शिवाय या इमारतीच्या वापराचे प्रमाणपत्र महाविद्यालयाने न घेताच तेथे हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. जाते, हे बेकायदा आहे. त्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास विद्यार्थ्यांच्या जिवीताचा प्रश्न निर्माण होणार असून या महाविद्यालयाच्या अनाधिकृत बांधकामावर सात दिवसांच्या आत कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज पालिका आयुक्तास दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
राजर्षी शाहू महाविद्यालयाचे ज्युनिअर सायन्स कॉलेज बसवेश्वर चौक परिसरात गेले आहे. त्या ठिकाणी टोलेजंग अशी इमारत उभी करण्यात आली आहे. शाहू महाविद्यालयाची ही भव्य इमारत अनाधिकृत आहे. महापालिका लातूर शहरातील अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम उघडून आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात बेकायदेशीर बांधकाम अतिक्रमणाच्या नावाखाली सामान्यांची घरे व दुकाने उठवत आहे. पण, राजर्षी शाहू महाविद्यालया सारख्या धनदांडग्यांच्या शिक्षण संस्थेस हातही लावला जात नाही. बांधकामानंतर महापालिकेकडून वापराचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तसे प्रमाणपत्र न घेता ही संस्था या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाच्या नावाखाली एकत्रीत करते. येथे काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी महानगरपालिका घेणार का? महाविद्यालयाच्या सर्व नियम धाब्यावर ठेवून करण्यात आलेल्या बांधकामाकडे महापालिका डोळे झाक का करते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या महापालिकेचे पदाधिकारी मुख्यतः भाजपचे नेते आहेत. असे असता ना महापालिका, राज्य व देशात भाजपचीच सत्ता आहे. यामुळे तर याकडे डोळेझाक होत नाही ना? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवाय महाविद्यालय प्रशासनाने महापालिका अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता महाविद्यालयासमोरील रिंग रोड आपल्या घरचा रोड असल्याप्रमाणे तोडला आहे. त्यांच्यावर या प्रकरणीही कारवाई करण्यात यावी. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने महापालिकेला अवघा सात दिवसांचा अवधी शाहू महाविद्यालयाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी दिला आहे.
त्यानंतर तेथील अवस्था अशीच राहिली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्ट मंडळाने एका निवेदनात पालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांना दिला आहे.या शिष्ट मंडळामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रशांत पाटील, प्रविण नाबदे, विशाल विहिरे, गजानन खमीतकर, विभाकर मोटे, रामभाऊ रायेवार, सौ. रेखाताई क दम, जितेंद्र गायकवाड, ऍड. राजेश खटके, सय्यद इब्राहीम, मुन्ना तळेकर, ताज शेख, कुलदीप जाधव, बंटी राठोड, नामदेव जाधव, इस्माईल शेख, बाळासाहेब जाधव, अनिल वरेकर, रितेश पाटील आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment