लातूर /प्रतिनिधी :पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुरुड व परिसरातील शेकडो युवकांनी भाजपात प्रवेश केला .भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हणमंत नागटिळक व तानाजी नागटिळक यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भाजपा युवा मोर्चाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली
शहराध्यक्षपदी मुक्तेश्वर पटणे ,उपाध्यक्षपदी महेश माकुडे ,अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्षपदी शरीफ सय्यद ,अनुसुचित जाती शहराध्यक्षपदी साहेबराव साळुंके ,यांची नियुक्ती करुन त्याना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले भाजपा तालुकाध्यक्ष विजय काळे ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विजय जाधव यावेळी उपस्थित होते .प्रवेश घेणार्यां मध्ये तानाजी शिंदे ,शिवाजी शेगर ,गोविंद शेगर आदीसह शेकडो युवकांचा समावेश आहे .
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment