नांदेड /प्रतिनिधी- मराठवाडा लोकसेवा मंडळ नंदनवन नेरली ऑक्सीजन पार्क बनले पाहिजे, या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणार्या १३ कोटी वृक्ष कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय शुभारंभ आज करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्प पुर्तीस निमित्त मराठवाडा लोकसेवा मंडळ नंदनवन नेरली,वन व सामाजिक वनीकरण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नंदनवन नेरली येथे ५ हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, वनसंरक्षक आशिष ठाकरे, सौ. अजंली डोंगरे,डॉ सुनील कदम,डॉ.हंसराज वैद्य, डॉ शीला कदम, विजय मालपाणी, अरविंद नरसीकर, डॉ. बजाज, विविध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले की, वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबी गांभिर्याने घेत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामार्फत व जनेतेच्या सहभागातून वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना वृक्ष लागवडीबाबतही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आवाहन केले. तसेच व लोकसहभागतून तयार करण्यात येत असलेल्या तलावाची यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पाहणी केली . यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले की, पावसाचे पाणी तलावात साठविल्याने येथील ५ हजार वृक्षांना पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी माहेश्वरी व अग्रवाल महिला मंडळाच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे तुळशीचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment