लातूर दि : लातूर शहरातील स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खून प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. अविनाश चव्हाणवर ज्या पिस्तूलमधून गोळ्या झाडण्यात आल्या ते पिस्तूल केज शहरातून पुरवण्यात आला होते. पिस्तूल विक्री करणार्या केजच्या रमेश श्रीमंत मुंडे (वय ३५) यास लातूर पोलिसांनी अटक केली असून त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यामध्ये गाजलेल्या लातूर शहरातील स्टेप बाय स्टेप या नावाजलेल्या कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खून प्रकरणाला आता वेगळी कलाटणी लागली आहे. अविनाश चव्हाण यांचा गेम करण्यासाठी मारेकर्यांनी केज शहरातील समर्थनगर भागामध्ये राहाणार्यां रमेश मुंडे याच्याकडून पिस्तूल खरेदी केले होते. दीड लाख रूपये देऊन हे पिस्तूल आणले गेले होते. या प्रकरणातील धागेदोरे हाती आल्यानंतर लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी रमेश मुंडे यास केजमधून अटक केली. त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवताच रमेश मुंडे याने आपणच पिस्तूल दिल्याचे कबूल केले आहे.
पिस्तूल विक्री करणारा आरोपी ताब्यात आल्याने पिस्तूल नेमके कोणाला विकले होते आणि या प्रकरणातील अजून आरोपी हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रमेश मुंडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा आहे. यापूर्वी बीडच्या कारागृहात त्याने एका प्रकरणात शिक्षाही भोगली आहे. दरम्यान, लातूर येथील स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसच्या अविनाश चव्हाण खून प्रकरणातील गुन्ह्याचा छडा लागणार अशी शक्यता निर्माण झाली आहे
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment