मतदारांच्या संख्येएवढी वृक्ष लागवड करणार : आ .विनायकराव पाटील

Tuesday, July 3, 2018

चाकूर, दि. २ (प्रतिनिधी):-
वृक्ष लागवडीपेक्षा ते जगवण्यासाठी तरूणांनी प्रयत्न करावेत. मतदार संघातील मतदारांच्या संख्येएवढी वृक्ष लागवड करून तिचे संवर्धन करणार असल्याचे प्रतिपादन आमदार विनायकराव पाटील यांनी हाळी खुर्द (ता.चाकूर) येथे वन विभागाच्या वतीने रविवार (दि.१) रोजी आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात केले.

वन विभागाने हाळी खुर्द येथील शंभर एक्कर जमीनीवर वृक्ष लागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सरपंच मुनिरपाशा पटेल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार विनायकराव पाटील उद्घाटक तर वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल सांगुळे, माजी सरपंच संगमेश्वर जनगावे, चेअरमन जलील पटेल, उपसरपंच निवृत्ती चामले, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.एन.जी.मिर्झा, सचिव नारायण बेजगमवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाटील, उपसभापती अशोक चिंते, उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी, नगरसेवक रविंद्र निळकंठ, शैलेश पाटील, सुरेश हाके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल सांगुळे म्हणाले, हाळी खुर्द येथील वन विभागाच्या नर्सरीमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. येथे निर्माण होणार्या जंगलामुळे येणार्या काळात पर्यटनाला चालणा मिळणार आहे. अहमदपूर परिक्षेत्रातील चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट या तालुक्यात यावर्षी दोन लाख पंधरा हजार वनविभागाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात येत आहे. या कार्यक्रमास वन परिमंडळ अधिकारी गोविंद माळी, संजय कोंपलवार, वनरक्षक प्रल्हाद घुले, निलेश बिराजदार, प्रल्हाद बडगीरे, माजी उपसरपंच पांडूरंग भोसले, दत्ता भोसले, ह.भ.प.मोहन महाराज साळुंके, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जगदीश भोसले, आकाश गिरी यांच्यासह रोटरीयन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हावगीराज जनगावे यांनी सुत्रसंचालन केले तर अध्यक्षीय समारोप व आभार सरपंच मुनिरपाशा पटेल यांनी मानले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment