मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विपीन इटनकर यांची महाराष्ट्रतील नाविन्यपूर्ण मोहीम
लातूर दि प्रतिनिधी : - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्व सामान्य माणसाला आपल्या हक्काचा निवारा दिला जात आहे परंतु ते वेळेत बांधकाम पुर्ण व्हावे यासाठी आज एकाच दिवशी 1000 घरकुल भुमीपुजन शुभारंभ व गृहप्रवेश करण्यात आला.आजचा दिवस जिल्हा परिषदेने आवास दिन साजरा केल्याची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितली.
या मोहिमेत जिल्ह्यातील जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व विभाग प्रमुख व इतर 100 अधिकारी आज विविध तालुक्यातील गावात जाऊन त्यांनी अपुर्ण घरकुलाची पाहणी करून नव्याने मंजुरी दिल्यानंतर त्याचे भुमीपुजन करण्यात आले.व ज्यांची घरकुले पुर्ण झाली आहेत त्यांचा श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सामुहिक ग्रहप्रवेश करण्या आला. व आज आवास दिवस साजरा केला.यामुळे घरकुलाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. राज्यातील पहीली व अभिनव अशी मोहीम अधिकारी तुमच्या दारी.. जाऊन राबविली. यावेळी डॉ विपीन इटनकर म्हणाले की योजनेतील अपूर्ण असणारी कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, ज्या तालुक्यात काम कमी आहे.
घरकुल योजनेसाठी लाभार्थी निवड झाल्यानंतर वर्षाच्या आत लाभार्थ्यांने घरकुल पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांनी विहीत मुदतीत घरकुल पूर्ण केले नाही त्यांना अनुदान देण्यात येणार नाही, व या कामात निष्काळजीपणा खपवुन घेतला जाणार नाही त्यामुळे प्रत्येकाने आपली कामे वेळेत पूर्ण करावी असेही् म्हणाले घरकुल संदर्भातील प्रत्येक माहिती ऑनलाईन असल्याने लाभार्थ्यांना विहीत मुदतीत घरकुलाचे काम पूर्ण करावेच लागणार आहे.
सर्वांसाठी घरकुल हे आपल्या शासनाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे. सन 2016-17-17-18व 18-19 मध्ये 13397. नागरिकांना पंतप्रधान आवास योजना व इतर योजने अंतर्गत घरकुल देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन वर्ष 2020 पर्यंत सामाजिक, आर्थिक जात सर्वेक्षणामध्ये समाविष्ट सर्व बेघरांना घरकुल देणार आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या कल्पनेतून व मार्गदर्शनाखाली व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुधीर भातलवंडे यांच्या नियोजनातुन हा उपक्रम राबविला आहे.यावेळी अति.मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी,डॉ संजय तुबाकले, डॉ.यु.डी बोधनकर, बाळासाहेब शेलार, बालाजी पुरी, मिनगिले, डॉ.जी.जी. प्रिये,जावेद शेख आदींनी भेटी दिल्या.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment