लातूरमध्ये महाराष्ट्र स्टार्टप्रमाणे लातूर स्टार्टअप वीकचे आयोजन करणार : पालकमंत्री संभाजी पाटील
लातूर दि.
01 :- राज्य
शासनाने अलीकडेच महाराष्ट्र स्टार्टअप वीकच्या माध्यमातून नव उद्योजकांना एक
व्यासपीठ मिळवून दिले होते. त्याप्रमाणेच जिल्ह्यात लातूर स्टार्टअप वीकचे आयोजन
करुन जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील युवकांना उद्योजक बनण्याची संधी निर्माण करुन
दिली जाणार असल्याचे प्रतिपादन कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व
माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.
येथील
एमआयडीसी परिसरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या आस्था स्कील डेव्हलेपमेंट या
प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी
महापौर सुरेश पवार, अशोक कुकडे, स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे, भारतीय
शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र आलूरकर, सचिव नितीन शेटे आदीसह कौशल्य
विकास अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री
निलंगेकर पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी
करुन देशातील तरुणांना कौशल्यक्षेम बनविण्यात येऊन त्यांच्या कौशल्याचा वापर
देशाच्या प्रगतीसाठी करण्याचे धोरण असून त्याचाच एक भाग म्हणून कौशल्य विकास
प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. व या केंद्रातून ग्रामीण भागातील युवकांना
विविध प्रकारच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देऊन स्वत:च्या व्यवसायासह त्यांना
रोजगारही उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सन 2017-18
मध्ये देशपातळीवर कौशल्य विकास कार्यक्रमाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र
शासनाला केंद्र शासनाकडून गौरविण्यात आलेले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात त्या
त्या जिल्ह्यातील गरजा पाहून त्या पध्दतीचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी शासन
परवानगी देत असल्याचे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. त्यामुळे त्या त्या भागातील
बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन त्याच भागात व्यवसाय अथवा रोजगाराची उपलब्धता
केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रधानमंत्री
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र आस्था
संस्थेच्या माध्यमातून लातूर येथे आजपासून सुरु होत आहे. व हा क्षण लातूरकरांसाठी
गौरवास्पद असल्याचे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. तसेच भारतीय शिक्षण प्रसारक
मंडळाचे आस्थाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील युवकांना प्रशिक्षित करावे.
त्याप्रमाणेच लातूर जिल्ह्याला स्टार्टअपचे हब निर्माण करण्याची सूचना त्यांनी
केली .
तसेच या
प्रशिक्षण केंद्राला विविध उद्योग व संस्थांशी जोडून येथील प्रशिक्षित तरुणाला
रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातील, असे निलंगेकर यांनी सांगून रेल्वे
बोगी कारखान्याच्या अनुषंगाने अभ्यासक्रम तयार करुन युवकांना प्रशिक्षण देण्यात यावे
व त्याकरिता रेल्वे बोगीचे काम करणाऱ्या ऑर्निवेल या कंपनीशी आस्था संस्थेला
संलग्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगून आस्था केंद्रातील अभ्यासक्रमाला प्रवेश
घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रधानमंत्री
कौशल्य विकास योजनाही कौशल्याची सोपी योजना असून या माध्यमातून युवकांनी प्रशिक्षण
घेऊन अथक परिश्रम करुन कौटुंबिक व सामाजिक स्थैर्य निर्माण करावे, असे आवाहन अध्यक्षीय
भाषणात अशोक कुकडे यांनी केले. तर संस्थेचे सचिव नितीन शेटे यांनी प्रास्ताविकात
संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यात पाच कौशल्य विकास केंद्र सुरु होत असून
लातूरमधील हे पहिले केंद्र आज सुरु होत असल्याची माहिती दिली. प्रारंभी
पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते भारतमाता व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे
पूजन करण्यात येऊन दीपप्रज्वलन करुन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार अण्णासाहेब साठे यांनी मानले .
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment