जिद्द,मेहनत,कष्ट आणि काहीतरी करण्याची प्रेरणा हेच यशाचे गमक-यशवंत भंडारे

Monday, July 2, 2018
लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाने केला गुणवंतांचा गुणगैरव

लातूर (प्रतिनिधी):-पत्रकार सगळ्यांचे प्रश्‍न मांडतो,स्वतःच्या प्रश्‍न-घरांकडे बघायला मात्र त्यांला वेळ नसतो याचे भान ठेवून त्यांच्या पाल्यांनी केवळ सरळ शिक्षण घेवून चालणार नाही,सध्याच्या काळ हा स्पर्धेेचा काळ आहे असे संागून ,जिद्द, मेहनत,कष्ट आणि काहीतरी करण्याची प्रेरणा हेच यशाचे गमक आहे,असे प्रतिपादन विभागीय माहिती व जनसंपर्क उपसंचालक यशवंत भंडारे यांनी केले.

लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने रविवार,दि.१ जुलै २०१८ रोजी पत्रकार भवन येथे पत्रकारांच्या दहावी,बारावी व अन्य परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्कूलबॅग,पॅड,पेन,डिक्सनरी,छत्री,स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवून सत्कार समारंभ आयोजित केला होता.त्यावेळी अध्यक्षपदावरुन यशवंत भंडारे बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून रिलायन्स लातूर पॅटर्नचे प्रमुख प्रा.उमाकांत होनराव,महाराष्ट्र विकास आघाडीचे सरचिटणीस बसवंतप्पा उबाळे,लक्ष्मणराव गुट्टे रुरल डेव्हलपमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर गुट्टे,चैतन्य ग्रुपचे विनोद पाटील,क्राईम रिपोर्टर असोचे शहराध्यक्ष राहूल मोहिते पाटील आदींची उपस्थिती होती.

आज दहावी,बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेले बहुतांश विद्यार्थी जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होतीलही.आज प्रचंड स्पर्धा आहे.त्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज आहे.कोणत्याही शिक्षणासाठी एंट्रन्स द्यावी लागत आहे,महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खुप कमी सहभाग आहे,तथापि गुंडगिरी,दारिद्नय असलेल्या बिहार राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी यात यशस्वी होवून दरवषीर्र् भारतीय प्रशासन सेवेत मोठ्या संख्येने दाखल होतात,याला कारण त्यांची पाचवी पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेवून तसे मार्गदर्शन केले जाते.आपल्याकडेही महाराष्ट्र शासन विद्यापीठे, बार्टी,यशदा,एसटीएस सारख्या संस्थांमधून स्पर्धा परीक्षेची सुविधा उपलब्ध करुन देत आहे,त्याचा जास्तीत विद्यार्थ्यांनी लाभ घेवून युपीएसी,एमपीएससीच्या व अन्य परीक्षांना सामोरे जावे असेही आवाहन यशवंत भंडारे यांनी यावेळी केले.

प्रा.उमाकंात होनराव यांनी शंकर गुट्टे यंाच्या मागणीचा धागा पकडत पत्रकारांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी त्रिपुरा विज्ञान महाविद्यालयाचे दरवाजे खुले असल्याचे सांगून, लातूर पॅटर्नचा उगम कष्ट,त्याग,परिश्रम आणि नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे झाला आहे.लातूर आपला स्वाभिमान आहे,सध्या संयम आणि सबूरीचा काळ असल्याने संयमाने घ्यावे.शारीरिक फिटनेससोबतच करिअर फिटनेस महत्वाचे आहे,चूकाची पुनरावृत्ती नको आहे असा सल्ला यावेळी दिला.

शंकर गुट्टे म्हणाले की, आज समाजात अनेक मोठी माणसे आहेत पण त्यांचे मन मात्र संकुचित असल्याचे पाहायला मिळतेय तथापि प्रा.होनराव सारखी माणसे समाजासमोर शिक्षणाचा पॅटर्न उभा करत आहेत.त्यांनी लातूर जिल्ह्यातील आई-वडिल नसलेल्या दहावी-बारावीच्या किमान २० मुलांना त्रिपूरामध्ये दरवर्षी मोफत द्यावे अशी मागणी केली.

बसवंतअप्पा उबाळे यांनी पत्रकारांनीही घर,पाल्यांकडे लक्ष देवून त्यांचे जीवन घडवावे असे आवाहन केले.पालक दत्तप्रसाद बनाळे,विद्यार्थीनी रोहिणी कलवले यांनी मनोगत व्यक्त केले.

लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकात मिटकरी यांनी पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या बक्षीसासाठी एक लाख रुपयांची ठेव ठेवण्यासाठी दिल्याचे सांगून सरचिटणीस सचिन मिटकरी यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष नृसिह घोणे यांनी केले.प्रा.युवराज हालकुडे यंानी सूत्रसंचालन केले.प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी संघांचे उपाध्यक्ष महादेव कुंभार,राज्य सदस्य त्र्यंबक कुंभार,संगम कोटलवार,मुरलीधर चेंगटे,काकासाहेब घुटे,होळे,बालाजी पिचारे व इतरांनी परिश्रम केले. याप्रसंगी बारावी उत्तीर्ण वैशाली तत्तापूरे,स्वप्नाली बनसोडे, विशाखा साबळे,अस्मिता मोरे,दहावी उत्तीर्ण प्रणव तत्तापूरे, श्रृती आचार्य, ऋग्वेदी तारे, राधिका देशमाने, प्रगती सोमवंशी, रोहिणी कलवले,वैभवी कांबळे, वेदांत पाठक, संध्या कुंभार,समशोद्दीन सय्यद,मानसी पाटील, साक्षी जिल्ले,आदित्य हणमंते,पूजन बनसोडे, रोहित फुलारी,प्रतिक्षा बागलगावे, सीबीएसईचा प्रथमेश देशमाने,वैष्णवी बनाळे,आकाश धुळशेटे  आणि आयआयटी परीक्षा उर्त्तीण शहादत पठाण या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला पत्रकार व परिवारातील सदस्य,पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment