परळी...... राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मी सरकारशी दोन हात करीत आहे. परळीतील जनतेसाठी आणि त्यांच्या विकासासाठी तर कितीही संघर्ष करण्याची आपली तयारी आहे. ज्यांना सत्ता असून, निधी आणता येत नाही त्यांनी साडेतीन वर्षात केवळ मी आणलेला निधी आडवण्याचेच काम केले आहे असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीडच्या पालकमंत्र्यांना लगावला आहे.
परळी तालुक्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या विकास दौर्यात शनिवारी सायंकाळी धनंजय मुंडे यांनी नागापूर, नागपिंप्री, बोधेगाव या गावांमधील विकास कामांचा शुभारंभ केला. कार्यक्रमास तालुकाध्यक्ष अॅड. गोविंदराव फड, पं. स. सभापती मोहनराव सोळंके, उपसभापती पिंटु मुंडे, न. प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड, जिल्हा सरचिटणीस माऊली गडदे, माजी उपसभापती विष्णुपंत देशमुख, नितीन कुलकर्णी, प्रकाश कावळे, प्रभुअप्पा तोंडारे, माणिकदादा सोळंके, भागवत मुंडे, युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. धनंजय मुंडे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यातील सत्ता असलेल्या आणि दोन खात्यांचे मंत्रीपद असलेल्या लोकप्रतिनिधीकडून मतदार संघात कायापालट होईल अशी अपेक्षा होती, मात्र हे काम इथल्या लोकप्रतिनिधींना कधीच करता आले नाही. मात्र सत्ता नसतांना मी आणलेला निधी आडवण्याचे काम मात्र त्यांना चांगले जमते असा टोला लगावला. यापूर्वीही नगरपालिकेतील निधी आडवण्याचे काम केले आणि आता ग्रामीण भागात आडवा-आडवी सुरू आहे. आपल्याला याचा योग्यवेळी जाब विचारायचा आहे आणि मतपेटीतून तो आपण विचारावा असे आवाहन त्यांनी केले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment