लातूर प्रतिनिधी :
समाजात एकतेचे, सदभावनेचे व विाासाचे नाते निर्माण होऊन सामाजीक सलोखा वाढण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महत्त्वाचे आहे. यातून विचारांची देवाणघेवाण होऊन सामाजीक सलोखा वाढण्यास मदत होते. ईदमिलन निमीत्त माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी ईद मिलन व महफिल ए मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
ईद मिलन निमीत्त शनिवार दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता दगडोजीराव देशमुख सभागृह, मार्केड यार्ड, लातूर येथे महफिल-ए-मुशायरा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. यामध्ये देशपातळीवरील प्रसिद्ध शायर सहभागी होणार आहेत.
या महफिल ए मुशायरा कार्यक्रमास डॉ. राहत इंदौरी, नईम अख्यत्तर बुर्हानपूरी, अल्ताफ जिया, कैसर खालीद, डॉ.सागर त्रिपाठी, मुश्ताक अहमद, सुंदर मालेगावी, नईम फराज, सतलज राहत इंदौरी, डॉ.कमर सुरूर, शबनम अली हे प्रसिद्ध शायर महफिले-ए-मुशायरा कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
महफिले-ए-मुशायरा कार्यक्रमास शायरीप्रेमीसह सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
थेट प्रक्षेपण होणार
लातूर शहरात दिग्गज शायरांच्या उपस्थित होणारा हा महफिले-ए-मुशायरा कार्यक्रम पहिल्यादाच हॅथवे एमसीएन स्थानीक वाहीनी नं. १२२ व अमित विलासराव देशमुख ऑफीसीयल फेसबूक वरून प्रसारीत करण्यात येणार आहे. लातूरकरांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment