चक्रव्यूह छेदणारे अभिमन्यू पवार

Sunday, June 24, 2018



संपादकीय 

नुकताच अतुल कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळा महाराष्ट्राचे अर्थमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले की, अभिमन्यू पवार हे अभिमन्यू चक्रव्यूह छेदणारे आहेत. इतिहासातील अभिमन्यू हा चक्रव्युहात अडकला होता. पण मुख्यमंत्र्यांचे सचिव असलेले अभिमन्यु पवार हे लातूरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आहेत. लातूरचे भाग्य आहे की, वर्षावर (मुख्यमंत्री निवास) चा कायम प्रभाव आहे. आठ वर्ष विलासरावजी मुख्यमंत्री होते. आता मुख्यमंत्र्याचे विश्‍वासू सचिव म्हणून अभिमन्यू पवार हे कार्यरत आहेत. कोणते काम कधी करून घ्यायच यात ते हुशार आहेत. लातूरच्या प्रश्‍नासंदर्भात बोलताना ना. सुधीरभाऊ म्हणाले, तुम्ही आमच्या (अर्थ) विभागाची ङ्गाईल क्लेअर करा. मी तुमच्याही ङ्गाईल मंजूर करतो हे लातूरकरांचे सद्भाग्य आहे. कारण मुख्यमंत्र्याकडे लातूरचे प्रश्‍न असलेले सोडवून घेण्यासाठी तुम्हाला दोन प्रतिनिधी लाभले आहेत. एक पालक मंत्री संभाजीराव पाटील व दुसरे मुख्यमंत्र्यांचे सचिव अभिमन्यू पवार. 

पुर्वी जेव्हा अभिमन्यू पवार हे वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घ्यायचे, लोकांचे प्रश्‍न सोडवायचे त्यावेळा लोकांत असा प्रश्‍न होता की, अभिमन्यू पवार हे कसं बुवा. 

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार यंत्रणेत अभिमन्यू पवार सक्रीय होते. वेगवेगळ्या विकास कामासाठी बैठका लावणे, पाठपुरावा करणे यासंदर्भात ते लक्ष घालत होते. पण जेव्हा रेल्वे बोगी प्रकल्पाचा भुमिपूजन समारंभ झाला त्यावेळा स्वत: रेल्वेमंत्री यांनी क्रिडा संकूलावर सांगितले की, या बोगी प्रकल्पासाठी ना. संभाजीराव पाटील निलंगेकर व अभिमन्यू पवार यांचा सततचा पाठपुरावा होता. रेल्वे मंत्री पियुष गोयल म्हणाले की, मी मुख्यमंत्र्याला बोलायचे असेल तर अभिमन्यू पवार यांना पकडतो. म्हणजे कामाला गती मिळते. तसेच स्वत: मुख्यमंत्री अभिमन्यू पवार यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पवार यांचा खास उल्लेख केला. तात्पर्याने अभिमन्यू पवार यांच्या आमदारकीच्या निवडणुकीला हिरवा झेंडा दाखविला. लोकांना व कार्यकर्त्यांना त्यावेळा लक्षात आले की, अभिमन्यू पवार यांच्याकडे एक आमदार म्हणून अनेक मंत्री पाहतात. 

खर म्हणजे एखाद्या मंत्र्याच्या सचिवाकडे एवढ्या अपेक्षेने लोक पाहत नाहीत. किंबहूना ङ्गोन न उचलणे, टोलवा-टोलवी करणे, उडवा-उडवी करणे, बनवा-बनवी करणे अशा प्रकारचं वागणारे खाजगी सचिव दिसून आलेले आहेत. 

चॅलेंज स्विकारणे यशस्वी केले 

लातूर येथे वडार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करणं, नियेाजन करणं व यशस्वी करण्याचे काम अभिमन्यू पवार यांनी केले. 
वडार समाजाच्या मेळाव्याला एवढ्या मोठ्या संख्येने वडार समाज बांधव उपस्थित राहतील या विषयी अनेकांच्या मनात शंका होती. पण अभिमन्यू पवार हे अत्यंत सतर्क राहून जे काम करतात त्यामुळे हा मेळावा यशस्वी झाला. कारण त्याचदिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इंद्रप्रस्थ जलभुमी अभियानाचा मोठा कार्यक्रम असल्यामुळे सर्व प्रमुख कार्यकर्ते तिकडे गुंतलेले होते. पण मुख्यमंत्री कार्यालयात गेल्या तीन वर्षात आलेल्या अभ्यासाचा, ज्ञानाचा लोकहितासाठी त्यांचा ते वापर करत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
देश पातळीवरील पुरस्कार 

अभिमन्यू पवार यांना देशपातळीवरील उत्कृष्ट कार्यकर्ता हा पुरस्कार देवून विद्यमान रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. त्यावेळा गडकरी हे अखिल भारतीय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी अभिमन्यू पवार हे भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी यांच्या सोबत होते. त्या संपुर्ण काळात कठोर परिश्रम जिद्द व नियोजनाची सवय आणि काही करून दाखविण्याची इच्छा शक्ती असल्यामुळे दिवसेंदिवस अभिमन्यू पवार हे जनतेत लोकप्रिय होत आहेत. मध्यंतरी लातूर महानगरपालिकेच्या विकासाचा निधी हा परत जात असताना एका दिवसात तो निधी परत लातूर महानगरपालिकेला पाठविण्यासाठी प्रयत्न केले. कृती केली. 

चक्रव्युव छेदणारच 
अभिमन्यू पवार यांचा लातूर शहर, लातूर ग्रामीण व औसा विधानसभा मतदार संघात संपर्क आहे. त्यांनी कि ल्लारी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात हे बैठक घेतली होती. लोकप्रतिनिधी, प्रशासन व जनता यांच्याशी संपर्क ठेवून ते विकासाचा वेग वाढविण्याच प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटत की, ना. नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीसजी, पालकमंत्री संभाजीराव पाटील यांची इच्छा असेल तेथून ते विधानसभा निवडणुक लढवतील असं वाटत. लातूर शहर, लातूर ग्रामीण व औसा विधानसभा येथे भाजपचा कधीही विजय झाला नाही. पण पवार-पाटील हे सहा विधानसभा, एक लोकसभा म्हणजे शत प्रतिशत भाजप करण्यासाठी कटीबद्ध आहेत. आणि जेथे भाजपचा झेंडा ङ्गडकला नाही तेथे भाजपचा झेंडा ङ्फडविण्याचे तात्पर्याने शत प्रतिशत भाजपा ते म्हणजे अभिमन्यू पवार चक्र व्यु छेदतीलच असं आम्हाला वाटते. 
तात्पर्य-जनतेची व नेत्याची जेथून इच्छा असेल तेथे पवार हे पावर सिद्ध करतील. व निश्‍चित चक्र व्यु छेदतील. व त्याचच एक पाऊल म्हणजे त्यांचा लोकसंपर्क व जनता दरबार.

आज अभिमन्यु पवार यांचा दरबार 
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव अभिमन्यू पवार हे सकाळी ११ वाजजा जनता दरबार घेत आहेत. तरी ज्यांच्या काही अडचणी समस्या असतील, त्यांनी शासकीय विश्रागृहावर उपस्थित रहावे अशा प्रकारचे सांगण्यात आलेले आहे. 
सध्या लातूर शहर, लातूर ग्रामीण व औसा विधानसभा मतदार संघ या तीनही मतदार संघात ते संपर्क ठेवून आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेणे, अडीअडचणी सोडवून घेणे व शासकीय नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या तसेच विविध विकास कामासाठी ते पाठपुरावा करत आहेत.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment