- कंधार मतदार संघासाठी १६० कोटीचा पिकविमा मंजुर.
- पेरणी पुर्वी शेतक-यांना मिळाला मोठा आर्थिक आधार.
मुखेड : - यशवंत बोडके तालुका प्रतिनिधी
मागील तिन वर्षापासुन मुखेड - कंधार मतदार संघात सरासरी पेक्षा कमी पावुस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता, मागच्या खरीपाच्या पेरणीचा पिकविमा मोठया प्रमाणावर शेतक-यांनी भरावा यासाठी आ.डॉ.तुषार राठोड यांनी मोठया प्रमाणावर शेतक-यांना पिकविमा भरावा यासाठी जागृत केले होते. यामुळे मुखेड - कंधार मतदार संघातील शेतक-यांनी पिकविमा भरला होता यातील बहुतांश षेतक-यांना तब्बल एकशे साठ कोटी रूपयांचा पिकविमा मंजुर झाला असल्याची माहीती आ.डॉ.तुषार राठोड यांनी एका पत्रकार परिशदेत दिली. सदर पिकविमा भरूण घेण्यासाठी लागणा-या रक्कमेत शेतकरी दोन टक्के तर शासन अठयानौ टक्के रक्कम भरली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
मुखेड - कंधार मतदार संघ हा पुर्णता डोंगराळ भागाणी वेढला गेला आहे, या भागात पुर्वीपासुनच सिंचनाची व्यवस्था नसल्याने या भागातील शेतकरी हा केवळ खरीपाच्या पिकावरच अवलंबुन असतो,मागील तीन वर्षापासुन या भागात सरासरी पेक्षा कमी पावुस झाल्याने शेतक-यांसमोर आस्मानी संकट उभे राहीले होते मागील पावसाळयातही या भागात सरासरीपेक्षा कमीच पावुस झाला यामुळे शेतक-यांनी मोठया प्रमाणावर पिकविमा भराव यासाठी आ.डॉ.तुषार राठोड यांनी विविध स्वरूपातुन नागरीकांना अवाहण केले यासाठी त्यांनी एक पिकविमा रथ तयार केला होता व प्रत्येक गावात आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन शेतक-यांना पिकविमा भरण्यासाठी जागृत केले होते यामुळे मतदार संघातील शेतक-यांनी मोठया प्रमाणावर पिकविमा भरला यांनतर कमी पावसामुळे पिकास फटका बसला शासनाची आनेवारी कमी निघाली. पिक सरासरी पेक्षा कमी आले याचा फटका शेतक-यांना बसला मात्र याची बरीच प्रमाणात भरपाई ही नुकत्याच मंजुर झालेल्या पिकविम्याच्या माध्यमातुन झाली असल्याचे दिसुन येत आहे.
मागील खरीप हंगामातील पिकासाठी मुखेड - कंधार मतदार संघातील १ लक्ष ८१ हजार ३६२ शेतक-यांनी ३ कोटी ९० लक्ष रूपयांचा पिमविमा भरला यात सोयाबीन ३०३०७ ,उडीद ९५७२ , मुग ९४१८ ज्वार १७३७ तुर १७०३ व कापुस १५२१ हेक्टर जमीनीवरील पिकाचा समावेश होता. यात मुखेड - कंधार मतदार संघातील पिकविमा भरलेल्या शेतक-यांसाठी तब्बल १६० कोटी रूपयांचा पिकविमा मंजुर झाला असुन यात पिकविमा भरताना हप्त्याच्या पुर्ण रक्कमेत शेतक-यांना केवळ २ टक्के रक्कम भरावी लागते तर ९८ टक्के रक्कम ही केंद्र व राज्य शासन भरते,भाजपा सरकार सत्तेत येताच प्रत्येकाला बॅंकेत खाते काढुन घेण्यासाठी अवाहण केले होते त्याचा फायदा आता शेतक-यांना मिळत असुन पिकविम्याची पुर्ण रक्कम थेट शेतक-यांच्या खात्यात जमा होत असल्याने यातील होणारा भ्रष्ट्राचारास आळा बसला असल्याची माहीती यावेळी त्यांनी दिली. पेरणी पुर्वी ही पिकविम्याची रक्कम प्रत्येक शेतक-यांना मिळत असल्यामुळे बळीराजास अर्थीक आधार मिळाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी जेष्ठ नेते माजी आ.किशनराव राठोड, माजी आ.अविनाशराव घाटे, जेष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, गंगाधरराव राठोड ,व्यंकटराव पाटील चांडोळकर, बालाजी पाटील अंबुलगेकर,प.स.सभापती अशोक पाटील रावीकर, खुषाल पाटील उमरदरीकर, जि.प.सदस्य संतोषभाऊ राठोड, नामदेव पाटील जाहुरकर,डॉ.माधव पाटील उच्चेकर, डॉ.विरभद्र हिमगीरे, प.स.सदस्य लक्ष्मण पाटील बाराहाळे, मनोज गोंड, लक्ष्मण पाटील खैरकेकर, तालुका कृषी अधिकारी विलास नारनाळीकर, राजु घोडके, हणमंत नरोटे,शिवाजी राठोड, सुधीर चव्हाण यांच्या सह अनेकजन उपस्थित होते.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment