◆लातूर - येथील सुरताल संगीत महाविद्यालयाचे गुरुवर्य तथा मराठवाड्यातील शास्त्रीय संगीताचे संगीत मार्तंड पं.शांताराम चिगरी गुरूजी यांच्या जीवनावर आधारीत परमेश्वर पाटील लिखित, " तालतपस्वी पं शांताराम चिगरी गुरुजी" या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
पं शांताराम चिगरी गुरुजी हे नाव गेली 40 वर्षे लातूर सह संबंध मराठवाड्याच्या संगीत प्रेमी रसिकांच्या मनावर कोरले गेले असून, याच गुरुजींच्या जीवनावर आधारित त्यांचाच विद्यार्थी परमेश्वर पाटील हसलगणकर यांनी तालतपस्वी पं शांताराम चिगरी गुरुजी हा ग्रंथ लिहला आहे. तब्बल अडीच वर्षे मेहनत घेऊन गुजींच्या जीवनातील अज्ञात पैलू, त्यांचा जीवन संघर्ष वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. अशा या ग्रंथाची प्रस्तावना मुक्त पत्रकार तथा पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केली असून त्र्यंबकदास झंवर यांच्या सह संगीत क्षेत्रातील जाणकार, गुरुजींचा सहवास आणि त्यांचा संघर्ष जवळून पाहिलेल्या अनेक कलावंतांचे लेख त्यात आहेत.
या ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाच्या निमिताने श्रवणीय अशा संगीत समारोहाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये गुरुजींचे शिष्य जगविख्यात तबला वादक पं मुकेश जाधव व जागतिक दर्जाचे सुंदरी वादक पं भिमान्ना जाधव यांची जुगलबंदी, झी सारेगमप व संगीत सम्राट विजेत्या अंजली - नंदिनी गायकवाड या उदयोन्मुख कलावंतांचे गायन तसेच नवोदित तबला वादक वैभव जाधव यांच्या सोलो वादानाचा कार्यक्रम होणार आहे.
या ग्रंथाचे प्रकाशन विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सह अध्यक्ष *ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर* यांच्या शुभहस्ते होणार असून विशेष उपस्थिती म्हणून काँग्रेसचे जेष्ठ नेते त्रंबकदास झंवर व अतुल देऊळगावकर यांची असणार आहे. *रविवार दि.१० जून २०१८ रोजी सायंकाळी ५.०० वा दयानंद सभागृह लातूर* येथे होणाऱ्या या समारंभास लातूर व परिसरातील संगीत प्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने सोनू डगवाले, मीनाक्षी कोळी, संदीप जगदाळे, प्रमोद भोयरेकर,संजय सुवर्णकार,शरद सूर्यवंशी,विशाल जाधव,अंगद गायकवाड,किरण लकडे, राधिका पाठक,पूजा झरीकुंटे, गिरीष नाईक, संजय कुलकर्णी आदींनी केली
No comments:
Post a Comment