पुणे, ९ जून :“पवित्र कुराण या ग्रंथामध्ये मोठा सार दडलेला असून प्रेम, बंधुभाव व शांतीचा संदेश या ग्रंथातून दिला जात आहे. कुराण हे फक्त मुस्लीमांसाठी नसून सर्व मानव जातीसाठी आहे. यातूनच सर्व समाजात एकात्मता निर्माण होईल. त्यामुळे पवित्र कुराणाचा संदेश समाजापर्यत पोहवचिण्याची आवश्यकताआहे, ”असे मत हैद्राबादयेथील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाचे कुलपती व भारतरत्न मौलाना अबुलकलाम आझाद यांचे नातू श्री. फिरोज बख्त अहमद यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत,मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) येथील जामा मस्जिद व समस्त मुस्लिम बांधव यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पवित्र कुराण सप्ताहाच्या(दर्सकुरान) समारोपसमारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी फिरोज बख्त अहमद म्हणाले, “महाराष्ट्रतील रामेश्वर येथे पवित्र कुराण (दर्स-ए-कुरान) हा सप्ताह जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे या सप्ताहाला विशेष महत्व आहे. एक दुसऱ्यांना मदत करणे हाच खरा बंधुभाव आहे. हिच शिकवण प्रॉफिट मंहमद यांनी सर्व मानव जातीला दिली आहे. सर्वांचा ईश्वर एक असून ही गोष्ट समाजातील सर्व लोकांनी समजून घेतली पाहिजे. वाद-विवाद न करता बंधुभावाने वागावे यामुळे समाजान शांतता प्रस्थापीत होईल. भारत देश धर्मनिरपेक्ष असून येथे अनेक धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत. भारतात अनेक धर्म असूनही संस्कृती मिळतीजुळती आहे. सर्व धर्मांचा संदेश आणि तत्व एकच असून हे भारतातील लोकांनी समजून घेतले पाहिजे.
No comments:
Post a Comment