नांदेडःप्रतिनिधी
आनंद नगर येथील वास्तूदाते जया-निवृत्ती माळी या दाम्पत्यांनी त्यांची वस्तू श्री श्री श्री १००८ जगद्गुरू भीमाशंकरलिंग महास्वामी केदारपीठ यांच्या चरणी गेल्या मार्च महिन्यात अर्पण केली आहे. सदरील वस्तू आता जयानिवृत्ती विद्यार्थी निलय या नावाने ओळखली जात आहे. त्या ठिकाणी बुधवार दिनांक ३० मे रोजी केदार जगद्गुरूंच्या महापूजेचे तसेच महाप्रसादाचे आयोजन माळी परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व धार्मिक वातावरणात संपन्न झाला यासोहळ्यासाठी लातूर,औरंगाबाद,अकोलासह नांदेड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने जगद्गुरुंचे शिष्य उपस्थित होते. जगद्गुरूंची इष्टलिंग महापूजा ,आशीर्वचन,व महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनि घेतला. या सोहळ्यात गंगाधरराव कुंटूरकर, ओमप्रकाश पोकर्णा,माधवराव पांडागळे,किशोर स्वामी,आनंद चव्हाण,प्रल्हाद केशतवार, डी.बी. फुलारी,गोविंद नांदेडे,बी आर चव्हाण,गणपतराव मुंडे, आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment