मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा. : ना संभाजीराव पाटील निलंगेकर

Thursday, June 14, 2018

- जगातील पहिले रेल्वे रुग्णालय ,
- 27 वर्षात 20 राज्यात 193 ठिकणी आरोग्य सुविधांची उपलब्धता
- तज्ञ वैद्यकीय अधिका-यांकडुन आरोग्य सेवा
- आजपावेतो 10 लाख रुग्णांवर मोफत उपचार 1 लाख 27 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया
- लातूर रेल्वे स्थानकावर दिनांक 16 जून ते 6 जुलै2018 या कालावधीत मोफत आरोग्य सुविधा


                                     
लातूर जिल्हयातील नागरिकांनी लाईफ लाईन एक्सप्रेस रुग्णालयातील
मोफत  आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा. : ना संभाजीराव पाटील निलंगेकर 

लातूर दि.13- जगातील पहिले चालते –फिरते रुग्णालय असलेली जीवन रेखा एक्सप्रेस (लाईफ लाईन एक्सप्रेस ) ही रेल्वे लातूर रेल्वे स्थानकावर आलेली आहे. या रुग्णालयामार्फत्‍ दिनांक 16 जून 2018 ते 6 जुलै 2018 या कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत जिल्हयातील गरजू रुग्णांवर मोफत आरोग्य सुविधा स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. अशी माहिती : ना संभाजीराव पाटील निलंगेकर यानी दिली

लाईफ लाईन एक्सप्रेस मार्फत लातूर रेल्वे स्टेशन येथे दिनांक 16 जून ते 6 जुलै चा कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया होणार आहेत. रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सोबत आधार कार्ड अथवा अन्य ओळखीचा पुरावा आणावा. तसेच भर्ती केलेल्या रुग्णाबरोबर एकाच माणसाला राहण्याची परवनगी आहे. तरी लातूर जिल्हयातील जास्तीत जास्‍त नागरिकांना या मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर , यांनी केले आहे.
मराठवाडा नेता च्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment