नवी दिल्लीःवृत्तसंस्था
बेहिशेबी मालमत्ताधारकांना झटका देण्यासाठी मोदी सरकारनं एक नवी शक्कल लढवली आहे. बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात जो कोणी माहिती देईल, त्याला मोदी सरकारकडून बक्षिसाच्या स्वरूपात १ कोटी दिले जाणार आहेत. प्राप्तिकर विभागानं बेहिशेबी मालमत्तेचा थांगपत्ता लावण्यासाठी ’बेनामी ट्रान्सफर सूचना रिवॉर्ड योजना २०१८’ला सुरुवात केली आहे.
या योजनेंतर्गतही बेहिशेबी मालमत्तेची माहिती देणा-याला १ कोटींचं बक्षीस मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं यासंदर्भात माहिती दिली आहे. बेनामी ट्रान्सफर सूचना रिवॉर्ड योजना २०१८’अंतर्गत जॉइंट किंवा ऍडिशनल कमिश्नर प्राप्तिकर विभागाचे संचालक यांच्या अखत्यारीत येणा-या बेनामी मालमत्तेसंदर्भात माहिती देणा-यास १ कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.विशेष म्हणजे माहिती देणा-याचं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. परंतु जर माहिती देणा-यानं चुकीची माहिती दिल्यास त्याला कोणतीही रक्कम मिळणार नाही. त्यासाठी प्राप्तिकर विभाग चौकशी करणार आहे. बेनामी मालमत्ता नियंत्रण कायदा, १९८८अंतर्गत येणारी बेनामी मालमत्तेची माहिती देणा-यास हे बक्षीस मिळणार आहे.

No comments:
Post a Comment