.
हिंगोली : प्रतिनिधी
हिंगोली पोलिस दलात गृह पोलिस उपाधीक्षक पदावर सुजाता पाटील काम पाहतात. त्यांची हिंगोलीहून मुंबई येथे बदली होत नसल्यामुळे कंटाळून त्यांनी राजकुमार व्हटकर विशेष पोलिस महानिरीक्षक आस्थापना यांना संदेश पाठवून आत्महत्येची धमकी दिली आहे. त्यांच्या या धमकीच्या प्रकारणामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मागील दोन वर्षापासून हिंगोली पोलिस दलात सुजाता पाटील ह्या गृह पोलिस उपाधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब मुंबई येथे असल्यामुळे त्यांनी सुरूवातीपासूनच मुंबई येथे बदलीसाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतु, बदली होत नसल्यामुळे हताश झालेल्या सुजाता पाटील यांनी थेट विशेष पोलिस महानिरीक्षक आस्थापना यांना भ्रमणध्वनीवर आत्महत्येच्या धमकीचा संदेश देत टोकाची भुमिका घेतल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
या पूर्वी सांगली प्रकरनातीतील आरोपीची मुलगी दत्तक घेण्याच्या प्रस्तावणे त्या राज्यभर चर्चेत आल्या होत्या तर मुंबई येथे पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या अपमानास्पद वागणूकी मुळे त्या प्रसिद्ध झाल्या होत्या, नव्याने त्यांनी बदलीसाठी दिलेल्या आत्महत्यच्या धमकीनी पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे वरिष्ठ काय निर्णय घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment