अण्णा हजारे यांच्या हस्ते महेश ढवळे यांचा सत्कार

Tuesday, May 29, 2018
लातूर / प्रतिनिधी: राज्याच्या अन्न आयोगावर नियुक्ती झाल्याबद्दल महेश ढवळे यांचा ज्येष्ठ समाजसेवक तथा भ्रष्टाचार विरोधी जन  आंदोलन न्यास चे  प्रमुख अण्णा हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .अन्न आयोगावर नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच  महेश ढवळे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांचे भेट घेतली . कार्यास शुभारंभ करण्यापुर्वी अण्णा हजारे यांचा आशीर्वाद घेतला .
यावेळी अण्णा हजारे यांनी पुष्पहार घालून महेश ढवळे यांचा यांचा सत्कार केला . यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. बालाजी कोंपनवार ,राष्ट्रीय सचिव अशोक सब्बन  ,विश्वस्त शाम असावा ,पठारे सर यांची प्रमुख उपस्थिती होती . याप्रसंगी अण्णा हजारे यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा झाली .पुरवठा विभागाअंतर्गत वाटप केल्या जाणार्‍या रेशनच्या धान्यात  मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी येतात .हा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी पुढाकार घेण्याचा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला . शालेय पोषण आहाराचे वितरण व्यवस्थित व्हावे , विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा ,यात कसलाही भ्रष्टाचार होऊ नये यासाठी पावले उचलण्याच्या सूचना अण्णा हजारे यांनी दिल्या . याशिवाय गरोदर  स्त्रिया , स्तनदा माता यांच्यासाठी  शासनाच्या असणार्या योजनांचा लाभ गरजूंना मिळावा यासाठी पदाचा वापर करा ,असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment