हिंदी- मराठी रिमिक्सवर थिरकले प्रेक्षक

Tuesday, May 29, 2018
हिंगोली / प्रतिनिधी 
बाई मी लाडाची गं..लाडाची, बोल मै हलगी बजाऊ क्या...,सोनू तुला माझ्यावर भरोया नाय का..., शांताबाई... तू चिज बडी है मस्त..मस्त यासह एक ना अनेक हिंदी - मराठी रिमिक्स गाण्यावर प्रेक्षक थिरकले. येथील संत नामदेव कवायत मैदानावर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कल्याण निधीसाठी आश्रफ खान प्रस्तूत मसाज और आवाजफऑर्केस्ट्रॉचे आयोजन रविवारी (दि.२७) करण्यात आले होते.
सायंकाळी ७ वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार तान्हाजी मुटकुळे, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या हस्ते झाले. हिंगोली पोलीस कल्याण निधीकरीता दरवर्षी आकेस्ट्रॉचे आयोजन करण्यात येते. यंदाही आश्रम खान प्रस्तुत साज और आवाज यांच्या चमूने बहारदार नृत्य सादर केले. यामध्ये प्रामुख्याने शांताबाई फेम राधिका आपटे पाटील यांनी केलेल्या शांताबाई गाण्याने उपस्थितांची दाद मिळविली. त्याच बरोबर धरती सायगावकर, सिमरन कौर आदी नृत्यांगणांनी बहारदार नृत्य सादर केले.
कार्यक्रमात सादर झालेल्या लावण्यांना प्रेक्षकांनी टाळ्या-शिट्ट्या वाजवून दाद दिली. यामध्ये बाई मी लाडाची गं लाडाची.. कैरी पाडाची.., आबा जरा सरकून बसा की निट..अप्सरा आली.., शांताबाई.., सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का.., चोरीचा मामला.., शालू नाच नाच.., तू चिज बडी है मस्त मस्त.. यासारख्या हिंदी- मराठी रिमिक्स गाण्याचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थित प्रेक्षकांनीही याला टाळ्याच्या गजरात प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा शिवरानी नरवाडे, माजी खा. शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर भोरे, राहुल मदणे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, मुख्याधिकारी रामदास पाटील, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार, ग्रामीण ठाण्याचे पोनि मारोती थोरात, सेनगावचे पोनि मधुकर कारेगावकर, औंढा ठाण्याचे पोनि कुंदनकुमार वाघमारे, रविकांत सोनुने आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment