सेट-नेट कार्यशाळेचे आयोजन

Tuesday, May 29, 2018
नांदेड/प्रतिनिधी -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणितीयशास्त्रे संकुलामध्ये दि.४ ते १० जून या दरम्यान सेट-नेट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेत तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत.मागील काही वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेल्या या कार्याशाळेमुळे नांदेड विद्यापीठातील सेट, नेट उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यानाचे प्रमाण वाढले असून यावर्षी १० विद्यार्थी सेट तर दोन विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.तरी या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संकुलाचे संचालक डॉ.ज्ञानेश्वर पवार यांनी केले. अधिक माहीतीसाठी विद्यापीठ संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा कार्यशाळेचे आयोजक डॉ.बी.सुरेंद्रनाथ रेड्डी (९०९६०७७७८९) यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment