राहुल गांधींना पप्पू म्हणणाऱ्या नेत्याला बाहेरचा रस्ता

Thursday, May 17, 2018
राजस्थान यूथ काँग्रेसचे सरचिटणीस ब्रह्मप्रकाश बिश्नोई यांनी व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये राहुल गांधी यांना पप्पू म्हटले होते. केशवचंद्र यादव या नेत्याला यूथ काँग्रेसचा अध्यक्ष केल्यामुळे बिश्नोई हे नाराज असल्याचे सांगितले जाते. ही नाराजी जाहीर करताना बिश्नोई यांनी या ग्रुपवर लिहिले होते, की राहुल गांधी यांना लोक पप्पू का म्हणतात हे आज कळाले.
बिश्नोई यांचा हा संदेश त्वरित व्हायरल झाला. त्यानंतर सोमवारी पक्षाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले.
बिश्नोई यांच्या टिप्पणीमुळे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व त्वरित रद्द करण्यात येत आहे, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने नुकतेच यादव यांना अध्यक्ष केले होते. स्वतः राहुल गांधी यांनी यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्याचे आमदार यादवेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांची स्तुती करताना त्यांना पप्पू म्हटले होते.

No comments:

Post a Comment