गोव्या पाठोपाठ आता बिहारमध्येही आरजेडीने सत्ता स्थापनेसाठी दावा करणार आहे. जर कर्नाटकमध्ये भाजप मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेची संधी मिळतेय तर आम्हालाही सत्ता स्थापनेची संधी मिळावी अशी मागणी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी केलीये.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव |
कर्नाटकमध्ये राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष भाजपला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं. आम्ही राष्ट्रपतींकडे मागणी करणार आहोत की बिहारमध्ये राज्यपालांनी जनतेचा कौल अमान्य करून सरकार स्थापन करून दिले हा लोकशाहीचा खून आहे. राष्ट्रपतींनी हे सरकार बरखास्त करून सर्वात मोठ्या आरजेडीला सरकार स्थापनेसाठी संधी द्यावी अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली.
No comments:
Post a Comment