भंडारा : शिवसेनेला भंडाऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीच्या अगोदर मोठा धक्का बसला आहे. भंडाऱ्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.
राजेंद्र पटले यांनी नागपुरात भाजपत प्रवेश करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने राजेंद्र पटले यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी नाराज होत भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, भंडाऱ्यात भाजपला पुन्हा पोवार समाजाचा नेता मिळाल्यामुळे याचा मोठा फायदा आगामी निवडणुकीत होणार आहे. विशेषतः भाजपला राजेंद्र पटले यांचा तुमसर विधानसभा मतदारसंघात फायदा होईल. शिवाय या लोकसभा पोटनिवडणुकीतही ते भाजपला मदत करणार आहेत.
No comments:
Post a Comment