पाकमधील दहशतवादी तळांवर भारताचा बॉम्बवर्षाव

Tuesday, February 26, 2019



पुलवामा येथील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन तळ उद्ध्वस्त केले आहेत.

बालाकोट या पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आता सुत्रांनी दिली आहे. 12 लढाऊ विमानांनी ही कारवाई केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. 

अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. एएनआयनं याबद्दलची माहिती दिली आहे.




 भारताच्या कारवाईत 'जैश-ए-मोहम्मद'चा दहशतवादी तळही बेचिराख

'जैश'चे बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद येथील तीन तळ उद्ध्वस्त

'जैश'च्या तळावर भारतानं १ हजार किलो वजनाचा बॉम्ब टाकल्याची माहिती

'मिराज २०००' या लढाऊ विमानांच्या मदतीनं केला हल्ला

पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकमध्ये घुसली भारताची १२ लढाऊ विमानं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

हवाई दलाच्या पायलटना माझा सलाम! भारताच्या कारवाईनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विट

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली कारवाईची माहिती

 भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला



No comments:

Post a Comment