महाराष्ट्रासाठी केंद्राकडून साडे चार हजार कोटींची मदत जाहीर !

Tuesday, January 29, 2019

नवी दिल्ली : दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारने साडे चार हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी मंगळवारी ही माहिती दिली. महाराष्ट्रासह केंद्राने अन्य 7 राज्यांना मदत दिली आहे. यानुसार केंद्र सरकारने महाराष्ट्राला 4 हजार 714.28 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पूर, भूस्खलन, ढगफुटी, गाजा वादळ आणि 2018-19 मधील दुष्काळग्रस्त सहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशांना केंद्राकडून अतिरिक्त निधी देण्यासंदर्भात आज उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल, कृषीमंत्री राधामोहन सिंह तसंच गृह, अर्थ, कृषी विभाग आणि नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कोणत्या राज्याला किती मदत?

महाराष्ट्र : 4714.28 कोटी (दुष्काळ)
कर्नाटक : 949.49 कोटी रुपये (दुष्काळ)
आंध्र प्रदेश : 900.40 कोटी रुपये (दुष्काळ)
हिमाचल प्रदेश : 317.44 कोटी रुपये (पूर आणि भूस्खलन)
उत्तर प्रदेश : 191.73 कोटी रुपये (पूर)
गुजरात : 127.60 कोटी रुपये (दुष्काळ)
पद्दुचेरी : 13.09 कोटी रुपये (वादळ)


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 7083550505 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment