वृत्तसंस्था :- गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधले. गुजरातमधल्या या मातब्बर नेत्याने राष्ट्रवादीचा मार्ग धरल्याने सगळेच चकीत झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वाघेला यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवार यांनी वाघेलांचे पक्षात स्वागत केले. यावेळी प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते.
शंकरसिंह वाघेला यांनी २०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. नंतर राज्यसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला मदत केली होती.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 7083550505 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment