आदर्श महाविद्यालयात युवा संसदेचे उद्‌घाटन

Tuesday, January 29, 2019

हिंगोली / प्रतिनिधी
येथील आदर्श महाविद्यालयात 28 जानेवारी रोजी सकाळी बहुचर्चित महाविद्यालयीन युवकांमध्ये लोकशाही मुल्य संवर्धित करून त्यांच्यातील संवाद कौशल्य, चिंतनशिलता इतर गुणांना वाव मिळावा, यासाठी जिल्हा युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रा.डॉ.बी.डी.वाघमारे यांच्या हस्ते झाले.

या जिल्हा युवा संसदेमध्ये जिल्ह्यातील विविध पात्र ठरलेल्या 50 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी साहित्यीक डॉ. जगदीश कदम, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल, कैलास नाईक, विकास जाधव, प्रा.जी.पी.चव्हाण, डॉ. विलास आघाव, उपप्राचार्य एल.एम.सामलेटी, ओ.एस.इंदाणी, विजय कवाने, आयोजक प्रा.ए.के.पठाण, डॉ. एस.एस.नगरकर, राम तोडकर आदींची उपस्थिती होती. खेळ व युवा मंत्रालय भारत सरकार राष्ट्रीय सेवा योजना, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, नेहरू युवा केंद्र व आदर्श महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा युवा संसदेसाठी डॉ. एस.ए.कुलकर्णी, डॉ. संजय नरवाडे, डॉ. आनंद भट्ट, प्रा. विलास पवार, प्रा.सुयोग दोडल, प्रा.टी.आर.हापगुंडे, प्रा.डी.डी.मस्के, डॉ. पी.पी.जोशी, डॉ. एस.डी.चव्हाण, डॉ. ए.व्ही. पावडे, डॉ. मारोती कोल्हे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment